कोकण

गणेशोत्सवात फुलांचा बाजार फुलला

CD

rat१८p११.jpg
६४७६०
रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे फुले, हार खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळते.
rat१८p१३.jpg
६४७६२
रत्नागिरी : झेंडूच्या फुलांचे सुरेख हार तयार करताना विक्रेते.
------------

गणेशोत्सवात फुलांचा बाजार फुलला
आवक वाढली ; दर झाले कमी, दहा लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज
रत्नागिरी, ता. १८ : गणेशोत्सव काळात बाजारपेठेत फुलांची मोठी आवक झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी राहिले. यंदा पाऊस नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातून फुलांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी, फुलांचे दर २० ते २५ रुपयांपर्यंत खाली आले. गणपतीसाठी विविध प्रकारच्या फुले, हारांची खरेदीही वाढली. त्यामुळे बाजारात जवळपास १० लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमी गणेशोत्सवात १५० रुपये किलो मिळणारा विक्री सुमारे १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे सुरू आहे. बाजारात शेवंती ४०० रुपये किलो, तर बटन गुलाब ६०० रुपये किलोने विकला जात आहे. लाल, पांढरी, पर्पल आणि बटन अशा विविध प्रकारच्या शेवंतीची आवक वाढल्याने ग्राहकांना पर्याय उपलब्ध झाले. सुट्या फुलांच्या तुलनेत तयार हारांना ग्राहकांकडून जोरदार मागणी पाहायला मिळत आहे. बाजारात २० रुपयांच्या साध्या हारापासून ते दीडशे आणि एक हजार रुपयांपर्यंतच्या विशेष हारांची विक्री सुरू आहे.
एकूण बाजारात १० लाखांची उलाढाल होत असली तरी दर घसरल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळालेला नाही. यंदा व्यापार ''ना नफा ना तोटा'' या तत्त्वावरच सुरू आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक विक्रेत्यांनी दिली आहे.
----------
चौकट १
आठ टन फुले, हार
कोकणातील सर्वात महत्वाचा सण म्हणजचे गणेशोत्सव. जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक गणेशमूर्ती स्थानापन्न होतात. ग्रामीण भागांत स्थानिक व परसदारी लावलेल्या जास्वंद, कुंकुमकेसर, शेताच्या बांधावर सहज मिळणाऱ्या दुर्वा व अन्य फुलांचे हार केले जातात. शहरी भागांत फुलांना मागणी जास्त. त्यामुळे झेंडू, लिली, शेवंती, अष्टर या फुलांच्या हारांना मोठी मागणी असते. आठवडाभरात दररोज शहरातील फुलवाल्यांकडून सुमारे सहा ते आठ टन झेंडू, सुटी फुले, हार विक्री करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यातून जवळपास दहा लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
----------
चौकट २
श्रावण-भाद्रपदात मागणी
श्रावणातही फुलांना मागणी भरपूर असते. त्यानंतर भाद्रपदात हरतालिकेपासून फुलांच्या विक्रीला मागणी वाढते. गणपती प्रतिष्ठापना, गौरी पूजन ते गणपती विसर्जनापर्यंत पुष्पहारांना प्रचंड मागणी असते. मूर्तिंच्या उंचीप्रमाणे हार वापरले जातात. सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपतीच्या मूर्ती साधारण १० ते १५ फूट उंच असल्यामुळे तिथे दहा फुटाहून अधिक उंचीच्या हाराला मागणी असते. यंदा गणेशोत्सवाच्या सुरवातीला १५० रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली. पण आजच्या घडीला १८० ते २०० रुपये दर आहे.
---------
कोट
हारांना लागणारा झेंडू कोल्हापुरसह रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्‍वर, मजगाव, पावस, कोतवडे यासारख्या गावांमधून मिळतो. पाऊस कमी असल्याने घाटमाथ्यावरूनही चांगली आवक झाली. यासोबतच लिली, अ‍ॅस्टरच्या फुलांना मागणी असते. फुलांच्या विक्रीपेक्षाही हार बनवून त्यामधून फायदा अधिक मिळतो. या व्यवसायात कलात्मक हार व चांगली फुले निवडण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
- निखिल पवार, कुवारबाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT