-rat१८p३१.jpg-
26O64896
साखरपा ः गणेशाच्या कानात गाऱ्हाणे सांगताना भक्त.
----
गणेशाच्या कानात सांगितले जाते गाऱ्हाणे
रोज सायंकाळी हितगुज ; श्रद्धेने जपली जातेय कान उघडणी परंपरा
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता १९ : गणेशोत्सवादरम्यान कोकणात अनेक परंपरा श्रद्धेने जोपासल्या जात आहेत. अशांपैकीच एक घराघरात पाळली जाणारी परंपरा म्हणजे गाऱ्हाणे घालणे. ही परंपरा गणरायाच्या थेट कानात गाऱ्हाणे सांगून जोपासली जात आहे.
या परंपरेला गणेशाचे कान उघडणे असे म्हणतात. घरोघरी गणेशाचे आगमन झाले की पाहुणे, दर्शन, आरती, प्रसाद, नैवेद्य यांची धावपळ दिवसभर सुरू असते. अशा वेळी सायंकाळी थोडा निवांत वेळ मिळाला की देव विश्रांती घेतात असा समज आहे. अशा वेळी त्याच्याशी हितगुज साधता येते अशी श्रद्धा आहे. अशा थोड्या निवांत वेळी घरातील प्रत्येक जण त्यांच्या कानात काहीतरी सांगत असतो. यालाच कान उघडणे असे म्हणण्याची प्रथा आहे.
दिवसभराच्या स्वागत सोहोळयानंतर सायंकाळी देव निवात झाले की घरातील प्रत्येक सदस्य त्याच्या कानात जाऊन त्याची सुख दु:ख, अडीअडचणी, चिंता, मनोकामना बोलून दाखवतो. बऱ्याच वेळा कोणी अशाच वेळी कानात नवसही बोलतात. हे सगळे हितगुज हक्काने केले जाते. आपले गाऱ्हाणे तो निवांतपणे ऐकून घेतो अशी श्रद्धा आहे. या परंपरेला कोणता विधी नाही की कोणता देखावा नाही. असते ते केवळ एक हितगुज. देवत्व काही काळ विसरून ते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहेत ह्या विश्वासाने गाऱ्हाणे ऐकवले जाते. देव त्या समस्यांचे निराकरण नक्की करतील हा विश्वास त्या कान उघडणीमागे असतो. ही परंपरा कोकणात घराघरात पिढानपिढ्या जोपासली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.