कोकण

ध्वजदिन निधी संकलन 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा

CD

ध्वजदिन निधी ३० सप्टेंबरपूर्वी जमा करा
मनुज जिंदल ः कल्याणकारी योजनांचा घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी ध्वजदिन निधीचे संकलन ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हा सैनिक मंडळ व जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी संकलन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
या बैठकीत माजी सैनिकांच्या विविध समस्या व कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला. युद्धविधवांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या जमिनीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठीही पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना ‘ईसीएचएस’ उपचारांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कोस्ट गार्ड रत्नागिरीच्या ‘एम. आय. रूम’मधून उपचार मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच पर्यटन क्षेत्रात माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, यासाठी एमटीडीसीकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या. खेड येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह व माजी सैनिक विश्रामगृहाच्या सातबारा उताऱ्यावरील भोगवटादाराचे नाव बदलण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले.
----
माजी सैनिकांच्या अडचणी सोडविणार
अशासकीय सदस्य माजी सैनिक प्रफुल्ल रेडीज यांनी तालुकास्तरीय समितीच्या बैठका दरमहा घेण्याची मागणी केली. यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली दरमहा पोलिस संरक्षण समितीची बैठक आयोजित करून माजी सैनिकांच्या अडचणी सोडविल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT