भंगार नौका हटविण्यासाठी अखेरची मुदत
मिरकरवाड्यासाठी २२ सप्टेंबर; मत्स्य व्यवसाय विभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः येथील मिरकरवाडा बंदरात अनेक नौका मालकांनी मोडकळीस आलेल्या, विनावापर असलेल्या नौका, नौका केबिन व अनावश्यक साहित्य अस्ताव्यस्त ठेवल्याने बंदरातील दैनंदिन कामकाज व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या नौका, साहित्य स्वखर्चाने २२ सप्टेंबरपर्यंत तत्काळ हटवावे, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.
सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. मुदतीत साहित्य न हटवल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून २३ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून हे सर्व साहित्य बंदरामधून हटविण्यात येईल. या कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही आणि नुकसान भरपाईचा कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच या संपूर्ण कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. मोहिमेच्या दिवशी म्हणजेच २३ सप्टेंबरला मिरकरवाडा जेट्टी परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना अनधिकृत पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या दिवशी अनधिकृत पार्किंग करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.