कोकण

भाट्ये किनारा किनारा स्वच्छ अभियान

CD

-rat१९p१५.jpg-
26O65025
रत्नागिरी ः भाट्ये येथे जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित स्वच्छता अभियानात स्वच्छता करताना अधिकारी, कर्मचारी.
-rat१९p१६.jpg-
26O65026
रत्नागिरी ः भाट्ये ग्रामपंचायत, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या माध्यमातूनही स्वच्छता अभियानात सहभागी अधिकारी, कर्मचारी.

-rat१९p११.jpg-
26O65021
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त शनिवारी भाट्ये येथे भारतीय तटरक्षक दलातर्फे आयोजित स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थी.
-rat१९p१२.jpg-
P26O65022
याप्रसंगी भाट्ये येथे तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने हवाई कसरती करून दाखवल्या.
---
भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन ; अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका, भाट्ये ग्रामपंचायत, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून भाट्ये समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली.
समुद्र, नदी, जलस्रोत या ठिकाणी आज विशेषत: प्लास्टिक प्रदूषण होत आहे. त्याची स्वच्छता करणे, हे प्रदूषण रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून करावी. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेऊन, प्लास्टिक प्रदूषण संपवून पर्यावरणाला हातभार लावा, असे आवाहन निवास उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून एकल प्लॉस्टिक वापरु नका, एकच ध्यास ठेवू या प्लॉस्टिक पिशवी हटवू, समृध्द पर्यावरणाचे रक्षण करू या, असा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे प्रकाशन आणि वितरण या वेळी करण्यात आले.
या वेळी पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, पंचायत समिती सदस्य अर्चना साळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी उमेश गावखडकर, पालिकेचे उपमुख्याधिकारी मयूर बेहरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.
---
स्वच्छतेची शपथ
मी माझ्या कार्यातून आणि जबाबदाऱ्यांतून भारतातील महासागर, समुद्रकिनारे आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा करतो. मी समुद्रकिनारे आणि जलस्रोत स्वच्छ ठेवीन, कचरा टाकणे तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळीन. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावीन आणि इतरांनाही असे करण्यासाठी प्रेरित करीन. ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ या संकल्पनेप्रति स्वतःला समर्पित करून, वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत व सुरक्षित भविष्य निर्माण करण्यासाठी माझे योगदान देण्याचा संकल्प करतो. अशी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली.
-----

भारतीय तटरक्षक दलाचा सहभाग

भारतीय तटरक्षक दल स्टेशन रत्नागिरीच्या वतीने आज झरीविनायक मंदिरालगतच्या स्वच्छता व सागरी संवर्धन मोहीम राबविण्यात आली. स्टेशन समन्वय पथकाच्या नेतृत्वाखाली अभियान सुरू झाले. या उपक्रमात भारतीय तटरक्षक दल, पोलिस, नागरी प्रशासन, वैज्ञानिक संस्था, सुरक्षा दल, शाळा आणि स्थानिक युवा वर्गातील २५० हून अधिक सहभागींनी एकत्र येत उत्कृष्ट आंतर-विभागीय समन्वय घडवून आणला. यामध्ये सीमाशुल्क विभाग रत्नागिरी (कस्टम्स), सागरी पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रमुख प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला. भारतीय तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर समादेशक शैलेश गुप्ता, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, तटरक्षक दलाच्या विविध यूनिट्सचे कमान अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT