कोकण

सहसंवेदना सजगता कार्यशाळा

CD

सहसंवेदना सजगता कार्यशाळा
२३ सप्टेंबरला देवरूखात
देवरुख, ता. २० ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने शताब्दी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय सहसंवेदना सजगता कार्यशाळा २३ रोजी देवरूखमध्ये आयोजित केली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, दिव्यांग मुलांचे पालक व कुटुंबीय, विशेष शिक्षक, समुपदेशक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्राचे विद्यार्थी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि संवेदनशील नागरिक यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
दिव्यांग क्षेत्रात गेली ३० वर्षे कार्यरत असणाऱ्या स्वागत थोरात यांची ही संकल्पना असून, तेच कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शकही आहेत. कार्यशाळेच्या समन्वयक पुण्याच्या स्वरूपा गोखले-देशपांडे असून त्या व देवरूखच्या रेवा कदम या सहाय्यक प्रशिक्षक आहेत. तर कार्यशाळेच्या संयोजक डॉ. वर्षा शिरीष फाटक आहेत. ही एक दिवसीय कार्यशाळा सृजन सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर, सावरकर चौक, देवरुख येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल. या कार्यशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये अपंगत्वाचे विविध प्रकार व त्यांतील आव्हाने, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, ज्ञानेंद्रियांचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ पालक, गुरुजन व नागरिकांशी कशाप्रकारे संवाद साधावा, समावेशकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नांव नोंदणीसाठी कार्यवाह शिरीष फाटक यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT