कोकण

तेऱ्ये परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य

CD

तेऱ्येतील पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य
शेखर निकमः एकता मित्र मंडळाच्या सभागृहाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २० ः ‘‘तेऱ्ये परिसरातील पाणीप्रश्न आणि जलजीवनाशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील," असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
तालुक्यातील तेऱ्ये येथे एकता मित्र मंडळाच्या नियोजित सभागृहाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निकम म्हणाले, मधळीवाडी आणि परिसराचा सर्वांगीण विकास करताना केवळ एखादे काम पूर्ण करणे हा उद्देश नसून, गावाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सुधारित विकास आराखडा तयार केला जाईल. त्यानुसार टप्प्याटप्प्याने विविध कामे मार्गी लावण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गावात एखादी वास्तू उभी राहते, तेव्हा केवळ भिंती उभ्या राहत नाहीत; त्या वास्तूमध्ये गावकऱ्यांचे विचार, आठवणी आणि आपलेपणा जपला जातो. मधळीवाडीतील हे सभागृहही अशाच आपुलकीचे केंद्र बनेल. या सभागृहाचा उपयोग गावातील प्रत्येक घटकासाठी व्हावा आणि येथून समाजहिताचे विविध उपक्रम राबविले जावे, अशी त्यांनी सूचना केली. तसेच नियोजित सभागृहामुळे गावातील कार्यक्रमांसाठी जागेची अडचण दूर होणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होणार असल्याने मधळीवाडीच्या सामाजिक वाटचालीला नवे बळ मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी माधवी गीते,आरुषी घवाळी, बंड्या पवार, अनंत घवाळी, संभाजी भुरवणे, संजय भुरवणे, प्रभाकर भुरवणे, दिलीप भुरवणे, आत्माराम गोमाणे, रणजीत गोमाणे, सुभाष भुरवणे, आज्ञेश भुरवणे, चंद्रकांत माने, काशीराम बारगुडे, शांताराम बडवे, सुषमा भुरवणे, सविता गोमाणे उपस्थित होते.

चौकट
तेऱ्येत बोटिंग सुविधेसाठी प्रयत्न
तेऱ्ये परिसरातील जलसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्याचा उपयोग बोटिंगसह पर्यटनविकासासाठी करता येईल का, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पर्यटनाला चालना मिळाल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि गावाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागेल, असे आमदार निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT