कोकण

आडीवरे-वाडापेठे येथे 10 कुटुंबांचा एक गणपती

CD

rat२१p५.jpg-
26O65362
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील मूर्तिकार सुरेश गुरव यांनी साकारलेली गणेशमूर्ती.
---
दहा कुटुंबे, गणपती मात्र एकच!

आडिवरेतील गुरव कुटुंबाची ४० वर्षांची परंपरा

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : कुटुंबाचा विस्तार झाला की, स्वतंत्र घर आणि स्वतंत्र गणपती अशी प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते; मात्र, आडिवरे-वाडापेठे येथील गुरव कुटुंबाने गेली ४० वर्षे एकच गणपतीची स्थापना करण्याची परंपरा जपली आहे. श्री महाकाली मंदिर देवस्थानाचे पुजारी असलेल्या गुरव यांची दहा कुटुंबे आजही एकत्र येऊन गणरायाची सेवा करतात.
कुटुंबातील ज्येष्ठ हरी सदू गुरव यांनी एकत्रित गणेशोत्सवाची ही परंपरा सुरू केली. एका कुटुंबाची कालांतराने दहा कुटुंबे झाली तरी गणपती मात्र एकच आणण्याची परंपरा कायम राहिली. आजही मूळ घरी सर्व नातेवाईक आणि स्नेही एकत्र येऊन गणेशाची पूजाअर्चा करतात. गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत ७० ते ८० जण एकत्रितपणे गणरायाची सेवा करतात. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाला जणू सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप प्राप्त होते.
गुरव कुटुंबातील मूर्तिकार सुरेश गुरव गेली ३० वर्षे मूर्तिकलेचा परंपरागत व्यवसाय जपत आहेत. ते स्वतःच्या कुटुंबासाठी साडेतीन ते चार फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करतात. गुरव कुटुंब श्री महाकाली मंदिर देवस्थानचे पुजारी म्हणूनही सेवा बजावते. एकत्र उत्सव साजरा करण्यात आनंद अवर्णनीय आहे, असे सुरेश गुरव यांनी सांगितले. बदलत्या काळातही एकत्रित गणेशोत्सवाची परंपरा सर्वांसाठी आदर्शवत आहे.
---
मूर्तिकलेचा वारसा
गुरव कुटुंब हे प्रसिद्ध श्री महाकाली मंदिर देवस्थानचे पुजारी आहेत. नवरात्रोत्सवात मंदिरात धार्मिक सेवा करताना देवीच्या मूर्ती घडवण्याचे कामही केले जाते. या माध्यमातून मूर्तिकलेचा वारसा पुढे नेण्याबरोबरच कुटुंबाच्या उदरनिर्वाहालाही हातभार लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT