कोकण

रत्नागिरी- 27 रोजी पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रम

CD

रत्नागिरीत २७ ला पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रम
रत्नागिरी, ता. २१ : रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित आणि समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) व पर्यटन संचालनालय (डीओटी) यांच्यातर्फे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.
डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्रचना या संकल्पनेवर हा जागतिक पर्यटनदिन साजरा केला जाणार आहे. देश-विदेशातून आता मोठ्या प्रमाणावर पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येत असतात. त्याचप्रमाणे येथे सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती व स्थानिक कलांना वाव देण्यासाठी हा जागतिक पर्यटनदिन साजरा करणार आहोत.
पर्यटकप्रेमी व पर्यटन व्यावसायिक तसेच टुरिस्ट गाईड, टुरिस्ट गाड्यांचे व्यावसायिक व स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक, आंबा बागायतदार, होम स्टे, हाऊसबोट व्यावसायिक, कोकणातील स्थानिक कलाकार, पर्यटन सहकारी संस्थांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुहास ठाकुरदेसाई, नंदू तांबे, मकरंद केसरकर, कातळशिल्पतज्ञ भाई रिसबूड यांनी केले आहे.

चौकट १
पर्यटनमित्र पुरस्कार वितरण
पर्यटनक्षेत्रात नावीन्यपूर्ण काम केलेल्या ५ महिला व ५ पुरुष यांना पर्यटनमित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा आणि स्थानिक स्तरावर व शासनस्तरावर वेगवेगळ्या सोयीसुविधांसाठी पर्यटनदिनातून मागण्या करण्यात येणार आहेत. या मागण्या जिल्हास्तरावरून मंत्रालय स्तरावर जाऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. अनेक सोयीसुविधा जिल्ह्यात आता निर्माण होत आहेत. शासनातर्फे नवीनच पर्यटन धोरण जाहीर झाले त्यामध्ये पर्यटक व्यावसायिकांना अनुदान देण्यात येते, त्याचे मार्गदर्शनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT