- rat२p९.jpg-
P26O67366
सावरी : येथील जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर व अन्य मान्यवर.
---
सावरीत पोषणासह स्वच्छतेचा जागर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २ : मंडणगड पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पांतर्गत सावरी ग्रामपंचायतीत पोषणाचे महत्त्व, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यावर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.
‘राष्ट्रीय पोषणमाह’ तसेच ‘सेवासंकल्प अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात पोषण महाआरती करण्यात आली. या वेळी पोषणयुक्त आहार, माता व बालकांचे आरोग्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. परिसर स्वच्छतामोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. सेवासंकल्प अभियानांतर्गत लाभार्थी नागरिकांच्या घरी भेट देऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, पंचायत समिती उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य दीप्ती घडशी व पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वरी दातीर, युवासेना तालुकाध्यक्ष विकास पवार, शिक्षक संजय घागरूम, ग्रामपंचायत अधिकारी दीपक टेमकर, पोलिस पाटील प्रेरणा घोसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.