कोकण

रोजगारासाठी मंडणगड येथे एमआयडीसी मंजूर

CD

एमआयडीसीतून मंडणगडात रोजगारनिर्मिती
योगेश कदम ः मुंडे महाविद्यालयात मेळाव्याचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २ : ‘स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मंडणगड येथे एमआयडीसी मंजूर झाली असून, भविष्यात त्यातून विविध आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही उपलब्ध करून देण्यात येत आहे,’ असे प्रतिपादन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात केले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याला ते आभासी पद्धतीने उपस्थित होते. या मेळाव्यात परिसरातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या मेळाव्याचे उद्‍घाटन नायब तहसीलदार रावसाहेब खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आयटीआय मंडणगडच्या प्रमुख सायली मोरे अध्यक्षस्थानी होत्या. या प्रसंगी खानविलकर म्हणाले, ‘रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून परिसरातील युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. युवकांनी या संधीचा लाभ घेऊन भविष्यात आपल्या तालुक्यातच रोजगारनिर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे पांडुरंग कानडे यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाच्यावतीने वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात. युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नीशा कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी आयएमसी सदस्य विजय खैरे, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, आयटीआयचे अमित तांबे आदी उपस्थित होते. डॉ. संगीता घाडगे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. विष्णू जायभाये यांनी आभार मानले.
---
आत्मविश्वासाने मुलाखती द्या
‘युवक-युवतींनी आपली शैक्षणिक पात्रता आणि आत्मसात केलेल्या कौशल्यांच्या आधारे विविध पदांसाठी आत्मविश्वासाने मुलाखती द्याव्यात’, असे आयटीआय प्रमुख सायली मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT