कोकण

निबंध स्पर्धेत उमर खतीब प्रथम

CD

निबंध स्पर्धेत
उमर खतीब प्रथम
चिपळूण : पूज्य गांधी प्रतिष्ठानतर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उमर खतीब याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, वैचारिक क्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी तसेच महात्मा गांधींचे विचार आणि मुल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर आपले विचार निबंधातून मांडले. विषयाची मांडणी, आशय, विचारांची सुसूत्रता, भाषाशैली आणि सादरीकरण या निकषांच्या आधारे निबंधांचे परीक्षण करण्यात आले.

-------
कुणबी संघास बळकटी
देण्याचा सभेत निर्धार
दापोली ः कुणबी सेवासंघ, दापोलीची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाळासाहेब खेर कृषी उ‌द्योग व प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संघाच्या कार्याला बळकटी देण्याच्यादृष्टीने अहवाल वर्षात कृष्णा मोरे, वसंत गायकवाड आणि गोविंद कोळंबे यांनी संस्थेचे आजीव सभासदत्व स्वीकारले. या तिन्ही नवीन आजीव सभासदांचा संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक सभेसमोर सादर करण्यात आले. त्यावर चर्चा करून अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली तसेच २०२५-२६चे संस्थेचे लेखापरीक्षण हिशोबपत्रक सभेसमोर मांडण्यात आले व त्यास सभेने मंजुरी दिली. सभेस संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------

आयसीएसच्या विद्यार्थ्यांमध्ये
कायदेविषयक जनजागृती

खेड ः तालुका विधी सेवा समितीच्या कायदेविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत सहजीवन संस्थेच्या आयसीएस महाविद्यालय, खेड येथे कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. या वेळी न्यायाधीश जी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘वैकल्पिक विवाद निवारण पद्धती व त्याचे फायदे’ तसेच ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ या विषयांवर मार्गदर्शन केले. न्यायालयीन प्रक्रियेऐवजी सामोपचाराने तसेच विविध वैकल्पिक पद्धतींच्या माध्यमातून वाद कसे सोडवता येतात, त्याचे फायदे आणि नागरिकांनी संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. मोबाईल फोनच्या अविवेकी वापरामुळे सामाजिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत असल्याचे सांगत सुजाण नागरिकत्व हीच राष्ट्राची खरी शक्ती असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

-------
महात्मा गांधी, शास्त्री
यांना अभिवादन
रत्नागिरी ः राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक संदीप सावंत यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.

-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT