rat२p१२.jpg ः
26O67397
आकांक्षा कदम
कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी
आकांक्षा कदम हिची निवड
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३ : साखरपा येथील आकांक्षा कदम हिची इटली येथे होणाऱ्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा २ ते ५ डिसेंबर या कालावधीत इटली येथे होणार आहे.
आकांक्षा ही शालेय जीवनापासून कॅरम खेळते. तिला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती उत्कृष्ट खेळाडू राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी मालदिव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले तर १४व्या वर्षी राज्यस्तरीय महिलागटाचे विजेतेपद पटकावले होते. राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्यपदके आणि सलग तीनवेळा ज्युनिअर राज्यस्तरीय गटाचे विजेतेपद मिळवत हॅट्ट्रिक केली. राज्यस्तरावरील महिलांच्या एकेरी गटात १५ वेळा विजेतेपद मिळवले असून, तिच्या नावे हॅट्ट्रिकची नोंद आहे. आकांक्षाने ३६ सुवर्णपदके, १३ रौप्यपदके, १३ ब्रॉन्झ पदके अशी एकूण ६२ हून अधिक पदके मिळवली आहेत. त्यातील चार सुवर्णपदके व एक रौप्यपदक अशी एकूण पाच पदके ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहेत. इटली येथील स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.