कोकण

नाअत गायनात गोवळकोटची खदीजा स्कूल प्रथम

CD

नाअत गायनात खदिजा स्कूल प्रथम

प्रश्नमंजुषेत २५ शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : कोकण सिरत कमिटी, चिपळूणतर्फे जिल्हास्तरीय ‘नाअत गायन स्पर्धेत’ गोवळकोटच्या खदिजा इंग्लिश मीडियम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.
स्कूलच्या हाजी मोहम्मद शमसुद्दीन असेंब्ली हॉलमध्ये नाअत गायन स्पर्धा आणि तालुकास्तरीय इस्लामियात प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात झाली. जिल्ह्यातील २५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्‍घाटनावेळी मौलाना वासिफ काजमी, इक्रा स्कूलचे संचालक मौलाना इलियास बगदादी, सलामा टुर्सचे हाफिज सलीम परकार, मकबूल साबळे, फैयाज सुर्वे उपस्थित होते. नाअत गायन स्पर्धेत गोवळकोट येथील खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम, पोफळी येथील अल अमीन हायस्कूल द्वितीय तर अली पब्लिक स्कूलचा तृतीय क्रमांकाने सन्मानित केले गेले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पोफळी उर्दू आणि महाराष्ट्र हायस्कूल, कडवई यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत अली शुजाउद्दीन परकार आणि मर्यम अन्वर शेख यांनी प्रथम क्रमांक मिळवला. लायबा मोहसिन बागवान व उस्मान जुनेद मेमन द्वितीय तर आयशा जहीर चौगुले व आमिना एजाज परकार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT