67800
पावसाने दिला दगा, टंचाईचा धसका
२० टक्के कमी पाऊस ; ५,५०० शेतकऱ्यांच्या १,८०० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
रत्नागिरी, ता. ४ ः जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिली असतानाच ऑक्टोबर हिटचाही तडाखा जाणवू लागला आहे. त्यामुळे उशिराने होणारी भातपिकांचे नुकसान निश्चित झाले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊसच झाला नसल्याने यावर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. धरणांमधील पाणीसाठ्यातही तुलनेत तूट आहे. या परिस्थितीनुसार तीन तालुके राज्याच्या दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट झाले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात भातशेती आणि टंचाईची स्थिती गंभीर आहे. याच परिस्थितीचा आढावा यानिमित्ताने घेतला आहे.
जिल्ह्यात २० टक्के कमी पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम व ६९ छोट्या धरणांमध्ये ७९ टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. कमी पावसामुळे भात शेतीचे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभागाकडून प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ५०० शेतकऱ्यांचे १८०० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून यावर्षी भात विक्री करुन त्यामधून उत्पन्न मिळवणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा खिसा रिकामा राहणार आहे.
खेड, चिपळूण या तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याची गंभीर स्थिती उद्भवू शकते. तसेच गतवर्षी वाशिष्ठी नदीपात्रात पाणीच नसल्याने लोटे औद्योगिक वसाहतीत पाणीच नव्हते. तीच परिस्थिती यंदा पुन्हा उद्भवण्याची भिती आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील धरणांमधील पाणी गावांपर्यंत पोहोचवण्याची वितरण यंत्रणा सक्षम नसल्याने ''धरण उशाशी आणि ग्रामस्थ तहानलेले'' अशी परिस्थिती टाळण्यासाठीचे आव्हान आहे.
चौकट
पाणीसाठ्यात घट
चिपळूण आणि गुहागर तालुक्यांत ओलाव्याच्या अभावामुळे जमिनीला भेगा पडल्या असून पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संगमेश्वर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अवघा १४७८.७ मिमी कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतीसोबतच ग्रामीण भागातील विहिरी व ओढ्यांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्याचा परिणाम भविष्यात काही दिवसात पहायला मिळणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस धावणारे टँकर यंदा एक महिना आधीच धावण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.