कोकण

रत्नागिरी- माझं गाव रिल स्पर्धेत आदित्य कोत्रे प्रथम

CD

rat४p४.jpg-
६७७१४
रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आयोजित माझं गाव रिल स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर मंडळी सचिन काळे, कश्ती शेख, शिल्पा पानवलकर, गिरीश शितप, ज्ञानेश कांबळे आदी.
---
‘रिल्स’मधून उमटला गावाचा रंग

‘आडस माझं गावं’मध्ये आदित्य कोत्रे प्रथम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आयोजित आडस माझं गावं रिल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात झाला. तालुक्यातून २७ स्पर्धकांनी यात भाग घेतला. या स्पर्धेत आदित्य कोत्रे (कापडगाव), सुतेज भाटकर (गोळप), राजदीप कदम (केळ्ये भीमउद्यान) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. ऋत्विक गोताड (झरेवाडी), यश सनगरे (हातखंबा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिनेते सचिन काळे, कश्ती शेख आणि लायन्स क्लब झोन चेअरमन शिल्पा पानवलकर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित केले. क्लबचे अध्यक्ष गिरीश शितप यांनी सांगितले की, आज शहरीकरणाला कंटाळून वीकएंड किंवा सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवन अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा गावच्या दिशेने वळलेल्या मानसिक विचारांसाठी ग्रामीण पर्यटन हा अर्थार्जनाचा एक मोठा मार्ग होऊ शकतो.
स्पर्धेसाठी ग्रामीण जीवनशैली, राहणीमान, परंपरा, गावातील धार्मिक स्थळे, प्राचीन शिल्पे, खाद्य संस्कृती, नैसर्गिक नदी नाले धबधबे, पारंपारिक शेती, उदरनिर्वाहाचे पारंपारिक स्त्रोत, आणि गावातील इतर वैशिष्ट्ये या निकषांवर आधारित रिल तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पारितोषिक वितरण समारंभासाठी पंचायत समिती सदस्य संयोग उर्फ दादा दळी, लायन्सचे पदाधिकारी पराग पानवलकर, छायाचित्रकार ज्ञानेश कांबळे, भूषण बागुल, संस्कार नेहरू युवा मंडळ झरेवाडी अध्यक्ष औदुंबर कळंबटे, संस्कृती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राजेश गोसावी, मानकरी वसंत कळंबटे, अनंत शितप, सचिव सुनील डांगे, खजिनदार नेहा सुर्वे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT