कोकण

सकस पशुखाद्य निर्मिती

CD

पेंढ्यापासून सकस पशुखाद्य निर्मिती
दापोली ः भात कापणीनंतर शेतात उरणाऱ्या पेंढ्यावर योग्य प्रक्रिया केल्यास त्यापासून सकस व पौष्टिक पशुखाद्य तयार करता येते. याबाबत कृषी सखी गटाच्या वतीने धातोंडी वाडी येथे रावे कार्यक्रमांतर्गत युरिया प्रक्रियायुक्त चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमात ११ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंणकरकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. एन. एन. प्रसादे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक झाले. पाच किलो पेंढ्यासाठी १०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम मीठ, १५० ग्रॅम गूळ आणि अर्धा लिटर पाण्याचे मिश्रण तयार करून पेंढ्यावर समान रीतीने शिंपडण्यात आले. पेंढा लहान तुकड्यांत कापल्यास तो जनावरांना खाण्यास सुलभ होतो, अशी माहिती देण्यात आली.


यांत्रिकीकरण, मशरूम उत्पादनाचे मार्गदर्शन
दापोली ः वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी आधुनिक शेती यांत्रिकीकरणासह मशरूम उत्पादनासारखे पूरक व्यवसाय उपयुक्त ठरू शकतात, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. वनोशी तर्फे पंचनदी, गुरववाडी येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेत रावे अंतर्गत कृषी सखी व कृषी स्नेही गटाच्या वतीने संयुक्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. सचिन व्ही. पाठक यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध कृषी अवजारांची माहिती देत श्रम, वेळ व उत्पादन खर्च बचतीचे फायदे स्पष्ट केले. डॉ. एस. सी. रिठे यांनी मशरूमचे प्रकार, माध्यम तयारी, निर्जंतुकीकरण, स्पॉन, तापमान-आर्द्रता नियंत्रण व काढणीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुमारे ३० शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.


दुधापासून मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती
दापोली : घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या दुधाचे मूल्यवर्धन करून पौष्टिक व विक्रीयोग्य पदार्थ तयार करता येतात. महिलांना घरगुती कामासोबत अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळावा, या उद्देशाने वणौशी-बारेवाडी येथे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमात ‘कृषी स्नेही’ गटातर्फे हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. काळेश्वरी व समर्थ बचत गटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मिष्टी दोई, आम्रखंड आणि खोवा बर्फी हे पदार्थ प्रत्यक्ष तयार करून दाखविण्यात आले. समृद्धी जाधव, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे व आकांक्षा गाडगे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT