चिपळुणात पावसाची तूट कायम
सप्टेंबरमध्ये ४४.५ टक्के नोंद ; भात, नाचणीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने चिपळूण तालुक्यात पर्जन्यमानाची तूट कायम राहिली आहे. जूनमध्ये सरासरीच्या केवळ ६२.१ टक्के पाऊस झाला तर सप्टेंबरमध्ये ४२९.४० मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत १९१.६० मिलिमीटर म्हणजेच ४४.५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे असमान वितरण आणि दीर्घ खंड यामुळे भात व नाचणी पिकांवर परिणाम झाला आहे.
सप्टेंबर महिन्यातील पर्जन्यमानाच्या तुलनेत चिपळूण तालुक्याची स्थिती विशेष चिंताजनक असल्याचे उपलब्ध पर्जन्यनोंदीतून दिसते. सप्टेंबर २०२६ मध्ये तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत सुमारे ५३.७ टक्के पाऊस नोंदला गेला आहे. तालुक्यातील सात महसूल मंडळांत सप्टेंबरमध्ये गंभीर पर्जन्यतूट नोंदवली गेली आहे. त्यामुळे केवळ तालुक्याची सरासरी पाहण्याऐवजी मंडळनिहाय पावसाचे वितरण विचारात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः वरकस आणि उंच भागातील भातशेतीला पावसाच्या खंडाचा अधिक फटका बसला आहे. जूनमधील कमी पावसामुळे भाताची पेरणी व लावणी उशिरा झाली. त्यानंतर जुलैमध्ये पावसाचा खंड आणि सप्टेंबरमधील तुटवडा यामुळे उशिरा लावणी झालेल्या भातपिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः निमगरव्या आणि गरव्या भातवाणांना पावसाच्या ताणाचा परिणाम जाणवू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.