कोकण

महामार्गावर माभळे परिसरात जोडरस्त्यांना खड्डे

CD

- rat५p३.jpg-
26O67890
संगमेश्वर ः तालुक्यातील माभळे परिसरातील तात्पुरती मलमपट्टी केलेला रस्ता.
---
माभळे परिसरात जोडरस्त्यांना खड्डे
ग्रामस्थांची कसरत; बांधकाम विभागासह ठेकेदाराचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात सुरू असताना महामार्गाला जोडणाऱ्या गावांच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. माभळे परिसरातील जोडरस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिघडत आहे. खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असली तरी कायमस्वरूपी डांबरीकरण कधी होणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
महामार्गाच्या कामासाठी माती, खडी व साहित्याची मोठी वाहतूक सुरू असल्याने रस्ते खराब झाले आहेत. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ठेकेदार कंपनीने केवळ खडी टाकली; मात्र पावसामुळे व अवजड वाहतुकीमुळे खडी निघून रस्ते पुन्हा पूर्ववत होत आहेत. महामार्गाच्या कामामुळे माभळे येथील स्मशानभूमी आणि गणेश विसर्जन घाटाचीही दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. ठेकेदार कंपनीने जोडरस्ते, स्मशानभूमी, विसर्जन घाट आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करावी तसेच प्रत्येक काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
---
बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्या
महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकडे जाणारे रस्ते बंद होणे आणि पाण्याचा निचरा न होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई व आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Thane News: 'आवास'चा मार्ग मोकळा! ठाणे महापालिका ३,०८४ घरे बांधणार; कोणाला मिळणार लाभ?

आठ दिवसांनंतर मी माधुरी दीक्षितसारखी दिसणार म्हणत मुक्ता बर्वेने केलेला हेअरकट; घरी गेल्यावर मात्र... सांगितला तो किस्सा

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

SCROLL FOR NEXT