कोकण

चला साजरे करू पर्यावरणपूरक उत्सव

CD

( नियमित नाही.)

पर्यावरण संवर्धन---------लोगो

चला साजरे करू
पर्यावरणपूरक उत्सव!

निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकण किनारपट्टीला, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला ‘अल निनो’ च्या हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत आज दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. या संकटामुळे पाण्याची टंचाई, शेतीचे नुकसान आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत. निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जायचं असेल आणि दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करायची असेल तर केवळ शासकीय योजनांवर अवलंबून चालणार नाही. यासाठी समाजातील अर्धी शक्ती असलेल्या महिलांचा प्राधान्यक्रमाने सहभाग आवश्यक आहे. रत्नागिरीच्या रणरागिणींनी जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
------
दुष्काळाचा सर्वाधिक फटका घरातील महिलांना बसतो कारण, पाण्यासाठी त्यांना मैलोनमैल पायपीट करावी लागते. म्हणूनच, पाण्याचे महत्त्व आणि त्याचे नियोजन महिलांइतके उत्तम कोणीही करू शकत नाही. रत्नागिरीतील प्रत्येक महिलांनी आता पाण्याची भिशी सुरू करून त्या माध्यमातून जलसंवर्धनाच्या कामात पुढाकार घेणे गरजेचे आहे. याकरिता धोरणात्मक कृती कार्यक्रम असणे आवश्यक आहे. गावागावांत महिलांनी एकत्र येऊन पाण्याची भिशी किंवा ‘पाणी पंचायती’ स्थापन कराव्यात. पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे, विहिरींचे पुनर्भरण करणे आणि शेतामध्ये चर खोदणे यांसारखी कामे श्रमदानातून केली पाहिजेत.
पाणी साठवण्याची वेळ आता निघून गेली आहे; पण आणि बचतीची वेळ मात्र आता सुरू झाली आहे. याकरिता महिलांनी कॉर्नर मीटिंग घेऊन महिला मंडळे, भजन मंडळे, युवती मंडळे, शाळा-महाविद्यालय येथे जाऊन या संदर्भातील प्रचार-प्रसाराकरिता व्याख्यान देणे किंवा गोलगप्पांच्या कार्यक्रमातून पाणीबचतीचे महत्त्व पटवून सांगणे आवश्यक आहे. यावर्षी मॉन्सून लवकर माघारपणाला गेला आहे. त्यामुळे आता काटकसरीचा आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचा प्रचार प्रसारावर अधिक भर देणे आवश्यक आहे.
* पाण्याचा काटकसरीने वापर ः घरगुती वापराच्या पाण्याचे योग्य नियोजन करून ‘वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर परसबागेसाठी कसा करता येईल, याचे धडे प्रत्येक गृहिणीने गिरवले पाहिजेत.’ छोट्या छोट्या गोष्टीतून मोठमोठे काम या न्यायानुसार; घरामध्ये पाहुणे आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरून न देता अर्धा ग्लास पाणी प्रथम द्यावे आणि समवेत पाण्याने भरलेला तांब्या झाकणासहित ठेवावा कारण, यामुळे चार पाहुणे आले असता चार पाण्याचे ग्लास भरून दिले आणि प्रत्येक पाहुण्याने अर्धाच ग्लास पाणी प्यायले तर उरलेल्या प्रत्येक ग्लासमधले अर्ध अर्धे पाणी म्हणजेच दोन ग्लास पाणी आपण सामान्यतः सिंकमध्ये किंवा बेसिनमध्ये ओतून वाया घालवतो.
यामध्ये बदल करणे आवश्यक आहे म्हणून मानसिक बदलावर भर देणे आवश्यक आहे. ब्रश करताना नळ सुरू न ठेवणे किंवा हात धुण्यासाठी कमी क्षमतेचा नळ सोडणे आधी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे हरितआच्छादन ५० टक्के वर आल्यामुळे प्रत्येकाने वृक्षसंवर्धन कार्यात हिरीरिने पुढे येणे आवश्यक आहे.
अलनिनोमुळे वाढणारे तापमान आणि कमी होणारा पाऊस यावर एकमेव उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन होय. कोकणातील जांभा दगड आणि डोंगरउतारावर झाडे टिकवणे हे मोठे आव्हान असते.

* महिलांची भूमिका ः नवरात्रीच्या नऊ दिवसांत केवळ घटस्थापना न करता प्रत्येक महिलेने आपल्या भागात किमान नऊ झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प केला पाहिजे. स्थानिक फळझाडे जसे की, आंबा, काजू, फणस आणि औषधी वनस्पतींची लागवड महिला बचतगटांमार्फत व्यावसायिक स्तरावरदेखील केली जाऊ शकते. झाड लावण्यापेक्षा ते ‘जगवणे’ महत्त्वाचे आहे आणि महिलांमधील वात्सल्यभाव वृक्षसंवर्धनाला नक्कीच यशाकडे नेईल.
* मलबारी धनेश संवर्धन ः जैविक साखळीचे रक्षण रत्नागिरीच्या समृद्ध जंगलात आढळणारा ‘मलबारी धनेश’ (हॉर्नबिल) हा पक्षी कोकणच्या पर्यावरणाचा खरा दूत आहे. हा पक्षी मोठ्या फळांमधील बिया दूरवर पसरवून नैसर्गिक वृक्षारोपणाचे मोठे काम करतो; परंतु, वृक्षतोड आणि शिकारीमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
* रणरागिणींचे योगदान ः गावातील महिलांनी मलबारी धनेश पक्ष्यांच्या घरट्यांचे रक्षण केले पाहिजे. ज्या मोठ्या झाडांवर (उदा. अंजण, उंबर, माड) हे पक्षी राहतात ती झाडे तोडण्यापासून लोकांना परावृत्त करावे. महिलांनी पक्षीमित्र म्हणून पुढे येत धनेश पक्ष्यांचे महत्त्व नव्या पिढीला आणि पर्यटकांना पटवून दिले पाहिजे. जैविक साखळी टिकली तरच दुष्काळाची तीव्रता कमी होईल, हा संदेश त्यांनी घरोघरी पोहोचवणे गरजेचे आहे.

* नवरात्रोत्सव आणि घनकचरा व्यवस्थापन ः ‘स्वच्छता हीच सेवा’ ....लवकरच येऊ घातलेला नवरात्र उत्सव हा स्त्रीशक्तीच्या जागरणाचा काळ आहे. या उत्सवकाळात मंदिरे, सार्वजनिक मंडळे आणि घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, ज्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनते. प्लास्टिक, निर्माल्याचा कचरा यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते.
* शून्य कचरामोहीम ः रत्नागिरीच्या रणरागिणींनी या नवरात्रीत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा विडा उचलला पाहिजे.
* निर्माल्यापासून खतनिर्मिती ः पूजेचे निर्माल्य पाण्यात न टाकता त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रकल्प महिला मंडळांनी हाती घ्यावेत.
सद्यःस्थितीत याकरिता निवेदिता प्रतिष्ठानचा उत्तम असा निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव येथे सुरू आहे. या संस्थेकडे हा निर्माल्य पाठवून देण्याची व्यवस्था करावी किंवा अधिक माहितीकरिता संपर्क करावा.
प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या सजावटीला पूर्णपणे फाटा देऊन कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा. चहा किंवा सरबतासाठी वापरात येणारे एजंट थ्रोचे दिसायला कागदी असणारे कप हे मूलतः प्लास्टिकचे असल्यामुळे ते आरोग्याला आणि निसर्ग पर्यावरणालादेखील खूप हानिकारक आहेत. त्यामुळे त्याचा वापर टाळावा. ओला आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करून गावातील घनकचरा व्यवस्थापनाला शिस्त लावण्याचे काम महिला अत्यंत प्रभावीपणे करू शकतात.
रत्नागिरी जिल्ह्याला अलनिनोच्या दुष्काळी छायेतून बाहेर काढण्यासाठी आता पारंपरिक चौकटीबाहेर पडून काम करावे लागेल. नवरात्रीचा सण हा केवळ उपवास आणि गरबा खेळण्यापुरता मर्यादित न ठेवता तो ‘पर्यावरण रक्षणाचा उत्सव’ बनला पाहिजे. जेव्हा जिल्ह्यातील माताभगिनी आणि कन्या ‘रणरागिणी’ बनून जल, जमीन, जंगल आणि जीवसृष्टीच्या रक्षणासाठी मैदानात उतरतील तेव्हाच खऱ्या अर्थाने निसर्गाचे संतुलन पुनर्संचयित होईल. प्रत्येक कोकणवासियाने शाश्वत पर्यावरण विकासाची कास आत्मसात करण्याची वेळ आली आहे.

(लेखक शाश्वत पर्यावरणाचा विकास या विषयातील मानद डॉक्टरेट पदवीधर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT