कोकण

जिल्ह्यात २१ नोव्हेंबरला ‘विशेष लोकअदालत’

CD

जिल्ह्यात २१ नोव्हेंबरला
‘विशेष लोकअदालत’
रत्नागिरी ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे २१ नोव्हेंबरला विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. ही लोकअदालत रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केली जाईल. या अदालतीमध्ये प्रामुख्याने न्यायालयातील प्रलंबित बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित धनादेश अनादर प्रकरणे तडजोडीने व परस्पर संमतीने निकाली काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद यशवंतराव जाधव यांनी केले आहे. यासाठी आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव राजेंद्र रामचंद्र पाटील यांनी केले आहे.
--------
लांज्यात आज
कथाकथन स्पर्धेत
लांजाः तालुक्यातील वेरवली येथील श्रीराम विद्यालयात स्व. रमेश धोंडू डोळस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन उद्या (ता. ६) केले आहे. ही स्पर्धा चार विविध गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, कथाकथनासाठी ५ ते ६ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. या गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १ हजार ७५० आणि ५०० रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. दुसरा गट आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा आहे. यामध्ये कथाकथनासाठी ६ ते ९ मिनिटांचा कालावधी असेल. या गटातील विजेत्यांना अनुक्रमे १ हजार २२५, १ हजार आणि ७५० रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. तिसरा गट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून, या गटासाठी ६ ते १० मिनिटांचा वेळ निश्चित केला आहे. विजेत्यांना अनुक्रमे २ हजार, १ हजार ५०० आणि १ हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल. चौथा गट खुला असून, या गटासाठी १० ते १२ मिनिटांचा वेळ दिला आहे. या गटातील विजेत्यांना अनुक्रमे २ हजार, १ हजार ५०० आणि १ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
-----------
शिक्षण संस्थाचालक
तालुकाध्यक्षपदी सनगरे
संगमेश्वर ः दादासाहेब सरफरे विद्यालयात संगमेश्वर तालुका शिक्षणसंस्था चालक संघाची बैठक झाली. या वेळी संघाची नूतन कार्यकारिणी निवडली गेली. या सभेत संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी प्रभाकर सनगरे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तसेच विनय होडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष प्रताप देसाई यांनी तालुक्यातील शिक्षणसंस्थांच्या विविध प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळवून देऊ आणि शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलांना चालना देऊ असे आश्वासन दिले तसेच संस्थाचालकांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू, असेही सांगितले.
-------------------
अळंबी उत्पादन
तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
गावतळे ः दापोली तालुक्यातील शिवाजीनगर साखळोली येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या कृषी अभियांत्रिकी विभाग व वनस्पती रोगशास्त्र विभागाच्यावतीने कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान व अळंबी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम झाला. डॉ. पाठक यांनी आधुनिक कृषी अभियांत्रिकी, कृषी यांत्रिकीकरण आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध कृषी अवजारांची माहिती दिली. वैभव विळा, अतुल फळकाढणी यंत्र, नूतन आंबाकाढणी यंत्र, अमर लोरँथस कटर, अंकूर दातेरी फावडे, पंकज पडलर, कोनो वीडर, सुपारी सोलणी यंत्र आणि काजूकटर यांचा उपयोग, किंमत व उपलब्धतेविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. श्रद्धा रसाळ यांनी कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व अनुदानांची माहिती दिली. डॉ. रिठे यांनी अळंबी उत्पादन तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT