कोकण

संगमेश्वरमध्ये महामार्गावर अजूनही वाहतूक एकेरीच

CD

rat6p12.jpg-
68145
संगमेश्वर ः सोनवी पुलावर लावलेला एकेरी वाहतुकीचा फलक.
--------
संगमेश्वरमध्ये महामार्गावर वाहतूक एकेरीच
कामे रखडली; सोनवी पुलावरही एकेरी वाहतूक, सप्तलिंगी पुलाचे काम अर्धवट
संगमेश्वर, ता. ६ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी अद्याप रखडले आहे. काही भागात अजूनही एकेरी वाहतूक सुरू आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी महामार्गाच्या कामाला अपेक्षित वेग आलेला नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्ग एकेरी सुरू असल्याने संगमेश्वर तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संगमेश्वर परिसरातील सोनवी पुलादरम्यान अद्याप एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. पुलाच्या परिसरातील कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा वेळ वाया जात असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.
दरम्यान, सप्तलिंगी पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पुलाच्या कामासह महामार्गाच्या विविध टप्प्यांवरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत आहे. महामार्गाच्या मुख्य मार्गाबरोबरच साईड रस्त्यांचा प्रश्नही अद्याप कायम आहे. महामार्गाच्या कामामुळे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून रस्ते सुरू ठेवले जात असले तरी कायमस्वरूपी व सुरक्षित जोडरस्ते कधी तयार होणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याने स्थानिक नागरिक, पादचारी, दुचाकीस्वार तसेच सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा फटका बसत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कामांना वेग येईल, अशी अपेक्षा असतानाही अनेक ठिकाणी कामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT