कळंबस्ते मोहल्ल्यात बिबट्याचा संचार
संगमेश्वर ः तालुक्यातील कळंबस्ते येथील मोहल्ला परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी भरवस्तीतून बिबट्या फिरताना दिसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कळंबस्ते मोहल्ला ते अंत्रवली पुलादरम्यान रात्री साधारण दहा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, शेतात जाणे अथवा दुचाकीवरून प्रवास करणे ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
-rat६p१४.jpg-
साखरपा : पाढे पाठांतर स्पर्धेच्या बक्षिस वितरणवेळी उपमुख्याध्यापिका प्राजक्ता गद्रे.
कबनूरकर स्कूलमध्ये गांधी, शास्त्री जयंती
साखरपा ः येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापिका प्राजक्ता गद्रे, शिक्षिका पूजा वाघधरे यांच्या हस्ते गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषणांमधून गांधीजी आणि शास्त्रीजी यांचा जीवनपट व्यक्त केला. शिक्षिका वेदश्री येळगुडकर यांनीही आपल्या मनोगतातून गांधीजींचे विचार मांडले. तसेच शिक्षिका ऋतिका सावंत यांनीही लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.