कोकण

समस्यांचे जागेवरच निराकरण

CD

माजी सैनिकांसाठी प्रशासन सरसावले
लांज्यात मेळावा ; समस्या, तक्रारींचे निरसन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ७ ः लांजा येथील तहसीलदार कार्यालय सभागृहात आयोजित माजी सैनिक मेळाव्यात उपस्थित नऊ वीर नारी, वीर माता-पिता आणि माजी सैनिकांच्या अडीअडचणी व तक्रारी ऐकून घेऊन प्रशासनाकडून त्यांचे जागेवरच निरसन करण्यात आले. तसेच उर्वरित उपस्थितांना विविध प्रशासकीय कामांसाठी आवश्यक ते मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्याला तालुक्यातील २५ वीर नारी, वीर माता-पिता, माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या पाल्यांची उपस्थिती होती. तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला कार्यक्रमाच्या सुरुवातीला तहसीलदार प्रियांका ढोले यांनी उपस्थितांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. त्यांनी वीर माता व माजी सैनिकांचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी म्हणाले, ‘‘माजी सैनिकांनी केलेल्या देशसेवेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. महसूल व प्रशासनाकडून माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या अडीअडचणींना सर्वोच्च प्राधान्य देऊन त्या त्वरित सोडवल्या जातील.’’ त्यांनी उपस्थितांना महसूल विभागाच्या विविध योजनांचीही माहिती दिली. साहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांनी सैनिक कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. सर्व पात्र घटकांनी, माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले तर राहुल काटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

केस गळायला लागले, विग बनवून घेतले तरीही सोनाली बेंद्रेने ते घातलेच नाहीत, पण का? म्हणाली, 'बोलायला खूप सोपं वाटतं पण...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT