कोकण

फळपीक विम्याचे 30 कोटी बागायतदारांच्या खात्यात

CD

26O68350
एआय चित्र

बागायतदारांना ३० कोटींचा दिलासा
फळपिक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा ; ९ हजार १३ जणांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत पात्र बागायतदारांना विमा परताव्याची रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केले जाते. जुलैमध्ये जिल्ह्यातील २५ हजार ७८० बागायतदारांच्या खात्यावर ८८ कोटी ४ लाख ३८ हजार ३०६ रुपये जमा केले होते; मात्र मंडणगड, खेड, राजापूर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांतील ९ हजार १३ बागायतदार परताव्यापासून वंचित होते. तीन महिन्यांनंतर त्या बागायतदारांच्या खात्यावर ३० कोटी १९ लाख ४६ हजार ३०६ रुपये जमा करण्यात आले आहेत.
अवकाळी पाऊस, गारपीट, नीचांकी तापमान तसेच उच्चांकी तापमानामुळे आंबा व काजूपिकांचे नुकसान झाल्यास बागायतदारांना हवामान आधारित फळपिक विमा योजनेतून नुकसान भरपाई दिली जाते. गतवर्षी हवामानातील मोठ्या बदलामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. जिल्ह्यातील आंबा-काजूचे उत्पादन केवळ १५ ते २० टक्क्यांपर्यंत राहिले होते. याबाबतचा अहवाल कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाकडून सादर करण्यात आला होता. जिल्ह्यातील ३७ हजार ४२० बागायतदारांनी १८ हजार ५२८.१ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा काढला होता. त्यासाठी १११ कोटी ६९ लाख ३५ हजार रुपयांची विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली होती. नुकसान भरपाईच्या प्रक्रियेनंतर सुरुवातीच्या टप्प्यात २५ हजार ७८० बागायतदारांच्या खात्यावर ८८ कोटी ४ लाख ३८ हजार ३०६ रुपये जमा करण्यात आले. फळपिक विमा योजनेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ४८ दिवसांत परतावा देण्याची ही पहिलीच वेळ होती; मात्र मंडणगड, खेड, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांतील ९ हजार १३ बागायतदारांना त्या वेळी परताव्याची रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभागाकडून विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर विमा कंपनीने या बागायतदारांच्या खात्यावर ३० कोटी १९ लाख ४६ हजार ३०६ रुपयांचा परतावा जमा केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र बागायतदारांना फळपिक विमा योजनेअंतर्गत मिळालेला एकूण परतावा ११८ कोटी २२ लाख ८४ हजार रुपये झाला आहे.
---
परताव्यात १२ कोटींची वाढ
गतवर्षी २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील बागायतदारांना १०६ कोटी ११ लाख ५९३ रुपये फळपिक विम्याचा परतावा मिळाला होता. यंदा ही रक्कम ११८ कोटी २२ लाख ८४ हजार रुपये झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १२ कोटी ११ लाख रुपयांनी अधिक परतावा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT