rat७p१०.jpg-
26O68343
रत्नागिरी : मजगाव रोड- लक्ष्मीनगर येथे अध्यात्म मंदिर, भक्तनिवासाच्या पायाभरणी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना स. स. काडसिद्धेश्वर स्वामी.
---
अध्यात्म केंद्र मनाला देणार ऊर्जा
काडसिद्धेश्वर स्वामी ः लक्ष्मीनगर येथे केंद्रासह भक्तनिवास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : अध्यात्म मंदिरात केवळ आनंद, उत्साह प्राप्त करण्यासाठी यायचे नाही तर मनातल्या विवंचना, थकलेले मन, दुर्बल झालेल्या मनाला प्रफुल्लित करून ऊर्जा मिळण्यासाठी यायचे आहे. त्याकरिता या केंद्राची गरज आहे. हे एक ऊर्जाकेंद्र आहे. आपण अनन्यभावनेने प्रार्थना केली की, सद्गुरू ऐकून घेतात, असे प्रतिपादन कणेरीच्या सिद्धगिरी मठाचे मठाधिपती स. स. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले.
शहराजवळील मजगाव रोड-लक्ष्मीनगर, प्लॉट क्र. १ येथे मंगळवारी मठाधिपती स. स. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते स. स. काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्र व भक्तनिवासाची पायाभरणी करण्यात आली. त्या प्रसंगी ते मार्गदर्शनपर बोलत होते. स. स. काडसिद्धेश्वर भक्तमंडळाने कार्यक्रमाचे नियोजन केले. या वेळी जवळपास २०० हून अधिक भक्तमंडळी उपस्थित होती.
गणेशपूजन झाल्यानंतर स्वामीजींच्या हस्ते विधीवत शिळापूजन व पायाभरणी केल्यानंतर स. स. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आशीर्वादपर भाषण केले. काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले की, सद्गुरूंचा आशीर्वाद असेल तर सर्व होणार. हे अध्यात्म मंदिर निर्माण होणार. आपण जसे मेहनतीने आपले घर पूर्ण करतो त्याप्रमाणे हे मंदिर उभे करण्यासाठी भक्तांनी सढळ हस्ते मदत केली आहे. हे स्वधर्म स्थान आहे, हे धर्मस्थळ उभे करणे आवश्यक आहे. आपण कोणतेही बजेट ठरवून काम करत नाही. सद्गुरूंच्या आशीर्वादाने आतापर्यंत शेकडो कोटींची कामे केली आहेत. कोल्हापुरात व्हेटर्नरी कॉलेज बांधण्यात येणार आहे. त्यासाठी एका उद्योजकाने सीएसआरमधून १ कोटी दिले त्यामुळे चिंता करू नये. इमारत होईपर्यंत निधी मिळत राहील, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.