विरार ते दापोली थेट एसटी सुरू करा
अमोल काते ः गृहराज्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : रोजगार व व्यवसायानिमित्त मुंबईजवळील विरार परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी विरार ते दापोली थेट राज्य परिवहन (एसटी) बससेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शिवसैनिक अमोल काते यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी दापोलीचे आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. विरार परिसरात दापोली व मंडणगड तालुक्यातील हजारो नागरिक वास्तव्यास आहेत; मात्र, विरारवरून दापोलीसाठी थेट एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा गाड्या बदलत प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाया जाण्यासोबतच शारीरिक दगदगही सहन करावी लागत आहे. सर्वसामान्य चाकरमान्यांच्या खिशाला परवडणारी थेट एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. प्रवाशांच्या भावनांचा विचार करून काते यांनी हे निवेदन कदम यांना दिले. विरार ते दापोली थेट एसटी सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी बचत होईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या रास्त मागणीवर कदम यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच ही एसटी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विरारमधील दापोली-मंडणगडवासियांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.