कोकण

विकसित भारतासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे

CD

rat७p१४.jpg-
26O68352
रत्नागिरी : भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना डॉ. विनय नातू. सोबत ॲड. बाबासाहेब परुळेकर, प्रशांत यादव, सचिन वहाळकर आणि ॲड. विलास पाटणे.
---
विकसित भारतासाठी योगदान द्या
डॉ. विनय नातू ः भाजपतर्फे संकल्प सभा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : विकसित भारतासाठी प्रत्येक भारतीयाने योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प सभेत केले आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही योगदान दिले पाहिजे. सेवा संकल्प यात्रा महिनाभर सुरू असून, प्रत्येक मंडलात हे कार्यक्रम झाले. पक्षाकडून विविध कार्यक्रम येत राहणारच आहेत, त्यात राष्ट्र प्रथम या नात्याने सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपाचे माजी आमदार तथा रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विकसित भारत संकल्प सभेत ते बोलत होते. हा कार्यक्रम भाजप दक्षिण रत्नागिरीच्यावतीने स्वा. सावरकर नाट्यगृहात घेण्यात आला होता. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ज्येष्ठ नेते ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. विलास पाटणे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी ॲड. बाबा परुळेकर म्हणाले, याच स्वा. सावरकर नाट्यगृहात गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आले होते. त्यांच्या हस्ते कै. सदूभाऊ पाटणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी त्या वेळेपासून केलेला संकल्प आजही सुरू असून, त्याला २५ वर्षे झाली. ॲड. पाटणे यांनी भाजप देशातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सांगितले.
-------
कोट १
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. आज त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. २०४७ मध्ये असणारा विकसित भारत व राष्ट्रासाठी योगदान देण्याबाबत त्यांनी जाणीव करून दिली”

- प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT