-rat७p१७.jpg-
P26O68362
देवरूख ः ऑक्टोबर हीटच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांच्याकडे देताना ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, छोट्या गावणकर, सागर तांदळे, नीलेश भुवड आदी.
----
उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात घ्या
ठाकरे गटाची मागणी; शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ७ ः ‘ऑक्टोबर हीट’च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन शाळा दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित गावणकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अत्यंत असह्य होत आहे. अशा परिस्थितीत दुपारच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या व येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा विचार प्राधान्याने केला जावा. त्यामुळे जिल्ह्यात पूर्णपणे थंडी सुरू होईपर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख नंदादीप बोरूकर, राष्ट्रवादी नीलेश भुवड, बाबा साळवी आदी उपस्थित होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.