कोकण

बाणकोटमधील रखडलेल्या कामांना चालना देऊ

CD

- rat८p४.jpg-
26O68543
देव्हारे : प्रभाग समिती आढावा बैठकीत मार्गदर्शन करून सूचना करताना जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर व अन्य.
---
विकासकामांचा निपटारा तातडीने करा
प्रताप घोसाळकर ः बाणकोटमधील विभागांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ : ‘‘रखडलेल्या विकासकामांना चालना देऊन नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, हाच प्रभाग समितीचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी आपल्या भागातील समस्या या समितीच्या माध्यमातून मांडून उपक्रमाचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा प्रभाग समिती अध्यक्ष प्रताप घोसाळकर यांनी केले.
बाणकोट जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामे, नागरी समस्या आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी देव्हारे येथे प्रभाग समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानावरून बोलताना घोसाळकर यांनी प्रशासनातील विविध २९ विभागांच्या खातेप्रमुखांकडून कामांचा आढावा घेतला. या वेळी मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभाग समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस पंचायत समितीचे उपसभापती दीपक मालुसरे, गटनेते अनिल रटाटे, पंचायत समिती सदस्या दीप्ती घडशी, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, तालुका समन्वयक जितेंद्र दवंडे, उपतालुकाप्रमुख संजीव येसावरे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT