कोकण

करआकारणी न झालेल्या मालमत्ता रडारवर

CD

वाढीव बांधकामे येणार ‘कर’ कक्षेत
चिपळुणात नव्याने सर्व्हे; पालिकेच्या उत्पन्नात भर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 8 : चिपळूण नगरपालिकेच्या पंचवार्षिक (चतुर्थ वार्षिक) कर आकारणीसाठीच्या नव्या सर्व्हेमुळे शहरातील मालमत्ताधारकांच्या घरपट्टीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे 25 वर्षांनंतर प्रत्यक्ष मालमत्ता सर्व्हे झाल्याने जुन्या नोंदीतील त्रुटी, वाढीव बांधकामे, बांधकामाच्या प्रकारातील बदल तसेच यापूर्वी कर आकारणी न झालेल्या मालमत्ता पुढे येणार आहेत.
कर आकारणी वाढण्यामागे केवळ नवीन सर्व्हे कारणीभूत नसून अनेक बाबी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व्हे एजन्सीला सर्व मालमत्तांच्या बांधकाम पूर्णत्वाची वर्षे पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने काही ठिकाणी चुकीचे वर्ष नोंदले गेल्यास त्याचा थेट परिणाम घरपट्टीवर होऊ शकतो तसेच यापूर्वी कार्यालयीन पातळीवर झालेल्या नोंदींमध्ये प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती प्रतिबिंबित झाली नसल्याचेही दिसून आले.
नव्या सर्व्हेमध्ये ओपन टेरेस, बाल्कनी, गॅरेज तसेच घरालगतची पडवी बंदिस्त करून केलेले वाढीव बांधकाम आढळून आले आहे. काही मालमत्तांमध्ये दुरुस्ती अथवा फेरबदलामुळे बांधकामाचा प्रकार बदलला आहे. त्यानुसार संबंधित मालमत्तेच्या कर आकारणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेषतः जास्त उंचीच्या इमारतींमधील पोटमाळ्याचे क्षेत्रफळ मालमत्तेच्या क्षेत्रफळाच्या एकतृतीयांशापेक्षा अधिक असल्यास नियमानुसार त्यावर घरपट्टी आकारली जाऊ शकते. यापूर्वी अशा पोटमाळ्यांचा कर आकारणीत समावेश झाला नसल्याने अनेक व्यापारी गाळ्यांच्या घरपट्टीत वाढ कमी झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व्हेत कर आकारणीपासून वंचित राहिलेल्या मालमत्तांधारकांकडून घरपट्टी वसूल केल्यास पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
........
कोट
मागील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढीव घरपट्टीचा राजकीय फटका बसू नये यासाठी कर आकारणीला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे आता नव्या कर आकारणीच्या अंमलबजावणीवर शहराचे लक्ष लागले आहे. मालमत्ताधारकांच्या हरकती आणि प्रत्यक्ष मोजमापांची पडताळणी करूनच अंतिम कर आकारणी करावी.

- नित्यानंद भागवत, ग्रामस्थ, चिपळूण
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT