नेवरेत आरोग्य तपासणीसह
शासकीय योजनांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : तालुक्यातील ग्रामपंचायत नेवरे येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प क्र. २ (बिट मालगुंड-१) च्या वतीने ‘पोषण महा कार्यक्रम’ आणि ‘सेवासंकल्प अभियान’ उत्साहात झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला, किशोरवयीन मुली, पालक व बालकांना आरोग्य, पोषण आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य पूर्वा दुर्गवळी व आरेकर यांनी उपस्थितांना संतुलित आहार व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. आरोग्य विभागाच्या निवेंडकर यांनी महिला व मुलींच्या आरोग्याबाबत माहिती दिली. तसेच या वेळी उपस्थित महिला व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. नवचेतना-आधारशीला गटाच्या कोकण जिल्हा समन्वयक दीपिका मयेकर यांनी बालकांच्या मेंदूच्या विकासाचे महत्त्व स्पष्ट केले तर पर्यवेक्षिका सलोनी कालेकर यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली. या प्रसंगी पाककला स्पर्धा व रांगोळी प्रदर्शनातून पोषणाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, पूर्वा दुर्गवळी, बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सीएचओ ठाकरे, आरोग्यसेविका स्वाती कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सागर मायंगडे यांनी सूत्रसंचालन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.