चिपळुणात आज
डाक अदालत
रत्नागिरी ः चिपळूण विभागीय डाकघर अधीक्षक कार्यालयातर्फे शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता विभागीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधीक्षक डाकघर कार्यालयात ही अदालत होईल. पोस्टाच्या कामकाजासंबंधी अद्याप निराकरण न झालेल्या अथवा समाधानकारक उत्तर न मिळालेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. सर्वसाधारण टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचतबँक आणि मनीऑर्डर या संबंधी प्रलंबित तक्रारींवर सुनावणी होणार आहे. संबंधितांनी तक्रारींसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवरुखातील टपाल
कार्यालयासाठी निविदा
रत्नागिरी ः देवरूख पोस्ट ऑफिससाठी भाडेतत्त्वावर तयार इमारत उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या डाकघर अधीक्षक कार्यालयामार्फत सीलबंद निविदा मागवण्यात आल्या आहेत. इच्छुक इमारत मालकांनी अर्जासोबत इमारतीचा ढोबळ नकाशा, क्षेत्रफळ, अपेक्षित भाडे, असेसमेंट उतारा आणि इमारत उपलब्ध होण्याची तारीख नमूद करावी. निविदा लिफाफ्यावर ‘देवरूख पोस्ट ऑफिसकरिता इमारत भाडेतत्त्वावर देणेबाबत’ असा स्पष्ट उल्लेख करावा. निविदा अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी-४१५६१२ या पत्त्यावर १५ ऑक्टोबरपर्यंत सादर कराव्यात.
माजी विद्यार्थीसंघातर्फे
वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
राजापूर ः तालुक्यातील मूर येथील श्री काळेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थीसंघातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळी १० वाजता विद्यालयात ही स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून उपस्थित राहावे. तालुक्यातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री काळेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थीसंघातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.