कोकण

गावोगावी तयार होणार ‘पाण्याचा सातबारा

CD

गावोगावी तयार होणार ‘पाण्याचा सातबारा’
राजापुरात अंमलबजावणी सुरू; जलसाठा अन् वापराची अचूक नोंद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः गावातील उपलब्ध पाणीसाठा, त्याचा वापर, पुनर्भरण आणि शिल्लक पाण्याची अचूक माहिती उपलब्ध व्हावी तसेच वर्षभराच्या पाणीवापराचे प्रभावी नियोजन करता यावे यासाठी राज्यशासनाने गावोगावी ‘पाण्याचा सातबारा’ (जल सातबारा) तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राजापूर तालुक्यातही या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, गावनिहाय जल सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे.
महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्याच्या धर्तीवर तयार होणाऱ्या जल सातबारामध्ये गावातील विविध जलस्रोत, उपलब्ध जलसाठा, पाण्याचा वापर, पुनर्भरण आणि शिल्लक पाण्याची माहिती संकलित केली जाणार आहे. या माध्यमातून गावातील पाण्याचा डिजिटल ताळेबंद तयार होणार आहे.
शास्त्रीय पद्धतीने जलव्यवस्थापन करणे आणि पाण्याचा बेसुमार वापर टाळणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पिण्याचे पाणी, शेती तसेच अन्य गरजांसाठी वर्षभर आवश्यक असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जल सातबारा उपयुक्त ठरणार आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास विभाग आणि जलसंधारण विभाग यांच्या समन्वयाने हा उपक्रम राज्यातील निवडक भागांत प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे.
---
दृष्टिक्षेपात
जमिनीच्या सातबारा उताऱ्याप्रमाणे जमिनीचे क्षेत्रफळ, मालकी आणि पीकपद्धती दर्शवतो. त्याच धर्तीवर पाण्याचा सातबारा, गावच्या पाण्याचा उपलब्ध साठा, पाण्याचा होणारा वापर, पाण्याचा आवक-जावक प्रवाह आणि शिल्लक साठा या सर्वांची अचूक डिजिटल नोंद ठेवणारी स्वतंत्र प्रणाली आहे
----
जलसंपत्तीचे तीन टप्प्यांत ऑडिट
गावातील पाण्याचा सातबारा तयार करण्यासाठी वर्षभरामध्ये तीन टप्प्यांमध्ये गावातील पाण्याचे वा जलसंपत्तीचे ऑडिट होणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पावसाळ्यानंतर गावातील उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचे मोजमाप, दुसऱ्या टप्प्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पाण्याच्या वापराचा आणि उपलब्धतेचा आढावा तर तिसऱ्या टप्प्यामध्ये उन्हाळ्यातील टंचाईकाळात अंतिम जललेखा तपासणी आणि पुढील वर्षासाठी नियोजन केले जाणार आहे.
----------
कोट
शासन निर्देशाप्रमाणे गावोगावच्या पाण्याचा सातबारा (जल सातबारा) तयार करण्याचे काम तालुक्यामध्ये सुरू आहे. त्याबाबतची जलस्रोत, जलसाठा यांसह अन्य विविध प्रकारची आवश्यक असलेली सविस्तर माहिती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संकलित केली जात आहे.

-रोहित कुंभार, गटविकास अधिकारी, राजापूर पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT