कोकण

वातावरणाचा हापूसला तडाखा, पालवीची वाढ खुंटली

CD

- rat८p२१.jpg-
26O68613
राजापूर ः पालवी फुटलेली कलमे.
---
वातावरणाचा हापूसला तडाखा, पालवीची वाढ खुंटली
हंगामावर चिंतेचे ढग; पुढील १५ दिवसात पावसाची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः अलनिनोमुळे कोकणावर दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे. त्याचा परिणाम आंबा-काजू हंगामावर होण्याची शक्यता आहे. पावसानंतर हापूसच्या झाडांना येणारी मुख्य पालवी यंदा पूर्णक्षमतेने न आल्यामुळे सुमारे ६० टक्के पालवीची वाढ खुंटली आहे. पुढील पंधरा दिवसात पाऊस पडला नाही तर गतवर्षीप्रमाणेच उत्पादनाची स्थिती राहील, अशी भीती आहे.
ऑक्टोबर महिन्यातील तीव्र ऊन, जमिनीत कमी झालेला ओलावा आणि हवामानातील सततच्या बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून, उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. यामुळे जमीन आणि झाडांमधील ओलावा जलदगतीने सुकला आहे. झाडांना सुदृढ पालवी फुटण्यासाठी आवश्यक असलेला पाण्याचा जोर न मिळाल्याने पालवीची नैसर्गिक वाढ खुंटली आहे.
ऑक्टोबरमधील पालवी ही झाडांना वर्षभरासाठी आवश्यक असलेले अन्न पुरवण्याचे काम करते. हीच पालवी कमकुवत राहिल्याने झाडांची ताकद कमी झाली आहे. परिणामी, संजीवकांची प्रक्रिया केलेल्या झाडांवर येणारा मोहोर वांझ (फळ न धरणारा) निघण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.
या परिस्थितीमुळे यंदाच्या हंगामात हापूसचे एकूण उत्पादन ३० ते ४० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. मार्च-एप्रिलदरम्यान बाजारात येणारा सुरुवातीच्या टप्प्यातील आंबा यंदा अवघा चार ते पाच टक्केच मिळण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनाही हापूससाठी मोठी वाट पाहावी लागणार आहे. तसेच झाडांच्या कमकुवतपणामुळे आंब्याचा आकार आणि गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. दरम्यान, गतवर्षी पहिल्या दोन टप्प्यातील आंबा कमी झाल्यामुळे बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यानुसार यंदा आडाखे बांधून आंबा हंगामाची गणिते आखावी लागणार आहेत. हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या हंगामाचे गणित कोलमडण्याची चिन्हे असल्याने आंबा उत्पादक चिंतातूर आहे.
---
१५ दिवस निर्णायक; थंडी पडल्यास दिलासा
सध्या आंबापिकावर कोणत्याही मोठ्या रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नसला तरी पुढील १५ दिवसांतील हवामान संपूर्ण हंगामाचे भवितव्य ठरवणार आहे. जर येत्या दिवसांत पाऊस पडला आणि हवेतील आद्रता वाढली तर झाडांना पुन्हा नवी पालवी येईल आणि आंबा हंगाम आणखी लांबेल. पावसाऐवजी नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच योग्य प्रमाणात थंडी पडल्यास झाडांना चांगला मोहोर येण्यास मदत होऊ शकते. हवामानात बदल होऊन पाऊस झाल्यास ही स्थिती आंब्यासाठी प्रतिकूल असली तरी काजूपिकासाठी मात्र पोषक ठरू शकते, असा अंदाज कृषितज्ज्ञांनी वर्तवला आहे.
-----
कोट १
हापूस कलमांना पालवी नीट आली नाही तर उत्पादन मर्यादित राहील. यंदा संजीवक वापरलेल्या झाडांवर येणारा मोहोर फळ न धरणारा निघण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या हंगामाचे चित्र अडचणीचे आहे. अपेक्षित पाणी नसल्याने झाडांमधील कमकुवतपणा दिसत आहे. त्याचा परिणाम भविष्यात फळाच्या आकारावर व गुणवत्तेवरही होऊ शकतो.

- जयवंत बिर्जे, आंबा बागायतदार
-----
कोट २
जिल्ह्यात सध्या पावसाचा कोणताही अंदाज नसला तरी पुढील पंधरा दिवसांत हवामानाची स्थिती कशी राहते, यावरच यंदाच्या आंबा हंगामाचे भवितव्य स्पष्ट होईल. हवामानातील संभाव्य बदल आणि आद्रतेतील वाढ यामुळे यंदाच्या हंगामाबाबत अनिश्चितता आहे. अवकाळी किंवा वळवाचा पाऊस पडल्यास आणि हवेतील आद्रता वाढल्यास झाडांना नवी पालवी येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आंबा हंगाम लांबू शकतो.
- डॉ. किरण मालशे, संशोधक, भाट्ये नारळ संशोधन केंद्र
------
कोट १
बदलत्या वातावरणाचा परिणाम हंगामावर होणार असला तरीही सध्या कलमांवर आलेली पालवी वाचवण्याचे आव्हान बागायतदारांसमोर आहे. त्यासाठी औषध फवारणीचे वेळापत्रक निश्चित करावे लागेल. पालवी खुरटलेली असेल तर त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्या लागतील.

-उमेश रहाटे, आंबा बागायतदार
---

गतवर्षीचा हंगाम
• हवामान बदलामुळे जिल्ह्यात हापूस उत्पादनात सुमारे ८० टक्क्याहून अधिक घट
• एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे फळे आणि मोहोर गळून गेला
• दमट व ढगाळ वातावरणामुळे बागांमध्ये तुडतुड्या आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला.
• बागायतदारांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागली.
• आवक रोडावल्यामुळे पुणे, मुंबई आणि वाशी मार्केटमध्ये हापूसचे दर चढे राहिले.
• आंबा आणि काजू बागायतदारांसाठी प्रशासनाकडून पंचनामे व नुकसान भरपाईची प्रक्रिया राबवण्यात आली
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: उदगीरमध्ये भरदिवसा दोन घरांवर डल्ला; सहा लाखांचा ऐवज लंपास

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT