- rat९p६.jpg-
P26O68748
लांजा ः आगरवाडी येथील डोहाचा पऱ्या येथे आगरवाडी ग्रामस्थ आणि लांजा नगरपंचायतीच्या संयुक्त सहकार्याने दोन ठिकाणी बंधारे बांधण्यात आले.
लांज्यात ‘मिशन बंधारे’ला लोकसहभागाचे बळ
आगरवाडीत दोन बंधाऱ्यांची उभारणी; भूजल पातळी वाढण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १० ः पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने लांजा नगरपंचायत आणि लांजा-कुवे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बंधारे’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत लांजा आगरवाडी येथील ‘डोहाचा पऱ्या’ येथे लोकसहभागातून दोन ठिकाणी वनराई व कच्चे बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे पाणी परिसरातच मुरण्यास मदत होणार असून, आसपासच्या विहिरी आणि कूपनलिकांची (बोरवेल) पाणीपातळी वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे.
या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष उतरून श्रमदान केले. या वेळी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर आणि पाणी सभापती रफिक नेवरेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, आगरवाडीचे अध्यक्ष प्रमोद आग्रे, माजी उपनगराध्यक्ष मनोहर कवचे, सुरेश बापार्डेकर, महादेव पन्हळेकर, संदीप राबाडे, राजाराम करंबेळे यांच्यासह आगरवाडीतील ग्रामस्थ आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जलसंधारणासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने एकत्र येऊन राबवलेल्या या उपक्रमामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष चालना मिळाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे लोकसहभागातून तालुक्यात ठिकठिकाणी आणखी बंधारे उभारण्यात येतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
---
टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न
लांजा नगरपंचायत आणि लांजा-कुवे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बंधारे’ उपक्रम राबवण्यात आला. आगरवाडी येथील ‘डोहाचा पऱ्या’ येथे दोन वनराई व कच्चे बंधारे बांधण्यात आले. श्रमदानातून बांधणाऱ्या आलेल्या या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्याआधारे टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.