rat9p1.jpg-
68736
देवरूख ः राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित वनविभागाच्या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व वनविभागाचे अधिकारी.
जैवविविधतेचा पट विद्यार्थ्यांसमोर उलघडला
वन्यजीव सप्ताहानिमित्त व्याख्यान; माने महाविद्यालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ९ ः वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ''नेचर क्लब'' आणि वनविभाग देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक प्रतीक मोरे यांनी पॉवरपॉइंट सादरीकरण आणि चित्रफितींच्या सहाय्याने जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेचा पट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी वनविभाग देवरूखचे वनरक्षक आकाश कडूकर, छाया गोपणे, सहयोग कराडे, सुरज तेली, बाबासाहेब ढेकळे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या सुप्रिया काळे उपस्थित होत्या. मोरे यांनी पॉवरपॉइंट सादरीकरण आणि चित्रफितींच्या सहाय्याने जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेचा पट विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी देवराईचे महत्त्व, स्थानिक औषधी वनस्पती तसेच जिल्ह्यात आढळणाऱ्या भूईचक्र, भूईगोंडा व दीपकाडीसारख्या दुर्मिळ वनस्पती आणि त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. याशिवाय कोकणातील अभयारण्ये, तेथील पशुपक्ष्यांचे जीवन, वैशिष्ट्ये आणि ट्रॅपकॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपलेले रानकुत्रे, बिबट्या, लाल खेकडासारख्या प्राण्यांचे प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवून तंत्रज्ञानाचा वन्यजीव अभ्यासातील वापर स्पष्ट केला. या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरे विचारून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनीच मानले. कार्यक्रमाला विविध विभागांतील द्वितीय वर्षाचे सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.