कोकण

वारसासेतू पोर्टल प्रशासकीय कामकाजास उपयुक्त

CD

- ratchl९१.jpg ः
26O68815
चिपळूण ः वारससेतू पोर्टलचे उद्‍घाटन करताना आमदार शेखर निकम.
----
मृत्यूनोंदीच्या प्रक्रियेला डिजिटल गती
आमदार शेखर निकम ः पोर्टलचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः वारससेतू पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायत तसेच पालिकेत झालेल्या मृत्यूंच्या नोंदीची माहिती विविध नऊ शासकीय विभागांना एकाचवेळी मिळणार आहे. यातून मृत्यूनंतर संबंधितांच्या नातेवाईकांना विमा योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर येथे सुरू झालेले हे पोर्टल प्रशासकीय कामकाजास उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.
मृत्यूनोंदीनंतर प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी तसेच संबंधित माहिती आवश्यकता असलेल्या सर्व शासकीय विभागांना मिळण्याच्या हेतूने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत चिपळूण-गुहागर तालुक्यासाठी वारससेतू हे पोर्टल प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. त्याचे उद्‍घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या नावीन्यपूर्ण पोर्टलची माहिती देताना प्रांताधिकारी आकाश लिगाडे म्हणाले, वारससेतू पोर्टलमध्ये ग्रामपंचायत तसेच पालिकेत संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्याची माहिती आपोआपच नऊ विभागांना मिळेल. यामध्ये पंचायत समिती, तहसीलचा पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक विभाग, तालुका कृषी, महिला व बालकल्याण, ग्राममहसूल अधिकारी या नोंदीवर काम करतील.
उद्‍घाटनाला तहसीलदार प्रवीण लोकरे, परिक्षित पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, गुहागरचे उपसभापती नीलेश सुर्वे, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, जयंद्रथ खताते, दशरथ दाभोळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Bank Holiday: नवरात्रीत बँका बंद राहणार की सुरू? 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT