कोकण

शंभर टक्के गुण मिळवूनही पुरस्काराची प्रतीक्षा

CD

शंभर टक्के गुण मिळवूनही पुरस्काराची प्रतीक्षा
खेड ः दहावीच्या (एसएससी) परीक्षेत २०२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून १०० टक्के गुण मिळवणाऱ्या श्रेयस तांबे याला राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरूनही दहा महिने उलटले तरी पुरस्कार मिळालेला नाही. या प्रशासकीय दिरंगाईबद्दल त्याचे वडील नीलेश भीमराज तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रेयसने परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले; मात्र, पात्रता असूनही पुरस्कार न मिळाल्याने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत जिल्हा समाजकल्याण विभाग आणि सामाजिक न्यायविभागाकडे ई-मेल तसेच लेखी स्वरूपात वारंवार पाठपुरावा केला तरीही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचे नीलेश तांबे यांनी सांगितले. शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुरस्कारास होणाऱ्या विलंबाचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


विशेष मुलांसोबत विद्यार्थ्यांनी फुलवला आनंद
खेड ः विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने भरणे येथील तुकाराम बाबूराव कदम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे वेरळ येथील अनुग्रह विशेष शाळेला भेट देण्यात आली. या वेळी विद्यार्थी व प्राध्यापकांनी विशेष मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने निधी संकलित करून मुलांना खाऊचे वाटप केले. तसेच बडबडगीते, विविध खेळ आणि मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवले. विशेष मुलांच्या गरजा व अडचणी समजून घेऊन त्यांच्याप्रति संवेदनशीलता निर्माण करणे, हा या क्षेत्रभेटीचा उद्देश होता. या उपक्रमाचे शाळेच्यावतीने कौतुक करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका हेली जॉर्ज, जाधव, संदीप कांबळे, कविता जगताप आदी उपस्थित होते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Bank Holiday: नवरात्रीत बँका बंद राहणार की सुरू? 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT