कोकण

सहकारी संस्थांचा बहुआयामी सहभाग निश्चित करा

CD

-rat१०p४.jpg-
26O69006
पुणे : येथील वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शक ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासमवेत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी.
---
सहकारी संस्थांनी कार्यपद्धती बदलावी
ॲड. दीपक पटवर्धन ः आंतरराष्ट्रीय परिषद, बहुआयामी कामकाजातून विकास साधा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : सहकारी प्राथमिक संस्था या आजही ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहेत. बदलत्या जगामध्ये केवळ जुन्या शैलीत काम न करता बहुआयामी काम प्राथमिक कृषी संस्थांनी केलं पाहिजे, असे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पुणे येथे केले.
पुण्यातील वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम झाला. ‘प्राथमिक कृषी संस्थांच्या व्यावसायिक विकासासाठी योजना’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर ते बोलत होते. या कार्यक्रमात नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, झांबिया, गाबिया आणि भारत देशातील निमंत्रित प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बदलतं तंत्रज्ञान, बदलती बाजारपेठ, प्रचंड स्पर्धा, बदलते वातावरण अशा अनेक बदलांना सामावून सहकारी संस्थांनी मार्गक्रमण करायला हवे, यातच सहकारी संस्थांची यशोगाथा दडलेली आहे, असे परखड मत ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्रातील अंब्रेला टाईप सहकार विकास आणि त्यातून वाढलेली अर्थकारणाची गती, त्या भागातील विकास या विषयावर अनेक संदर्भ देत तिथल्या पॅक्स सोसायट्यांची यशोगाथा वर्णन केली.
रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने केलेली भरीव भांडवल निर्मितीचा प्रवास आणि त्यात मिळालेलं यश, ६३ टक्के ते शून्य टक्के एनपीए करताना केलेले प्रयत्न याबाबत ऊहापोह केला. सहकारातून समृद्धी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला दृष्टिकोन अंमलात आणण्यासाठी युवकांचा सहभाग आणि सहकारी संस्थांनी करावयाचे बदल यावरही अनेक उदाहरणे देत भाष्य केले. या प्रसंगी काही प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन ॲड. पटवर्धन यांनी समर्पकपणे केले.
---
३५ वर्षांच्या वाटचालीची पोचपावती
पतसंस्था चळवळ महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात फोफावली आहे. या अनुषंगाने आणि एकंदरीत पतसंस्था चळवळीच्या ताकदीसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधींशी संवाद साधता आला, यातून खूप समाधान मिळाले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर बोलताना माझ्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीची पोचपावती मिळाली, अशी प्रतिक्रिया या प्रसंगी ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Reliance Jio: भारतात येणार 6G नेटवर्क! इंटरनेटसंबंधी 'रिलायन्स जिओ'चं मोठं अपडेट; पाचपट वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार

एका मृत्यूभोवती गुंफलेलं गूढ, संशयाचं जाळं अन् अनपेक्षित वळणं; अजय पुरकरांचा ‘केस नं. ९९’ येतोय ओटीटीवर

Ranji Trophy 2026: ठरलं तर मग ! उद्यापासून रणजी ट्रॉफीचा थरार सुरू; ३८ संघांमध्ये चुरस, तुमच्या आवडीच्या टीमचा सामना कधी? वाचा संपूर्ण शेड्युल!

सोनाली बेंद्रेला 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातील 'छम छम' गाण्यासाठी किती पैसे मिळाले? म्हणाली, 'केदार शिंदेने...'

SCROLL FOR NEXT