कोकण

राजापूरच्या टंचाई निवारणासाठी अडीच कोटींचा आराखडा

CD

राजापूरच्या टंचाई निवारणासाठी
अडीच कोटींचा आराखडा
नगराध्यक्ष खलिफे ; बंधारे, गळती रोखणे, टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन
राजापूर, ता. ११ ः तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. शहरासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा टंचाईकृती आराखडा तयार केला असून, तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांनी केले.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा खलिफे यांनी पत्रकार परिषदेत नगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या वेळी बांधकाम सभापती सुबोध पवार उपस्थित होते. कोंढेतड भागातील पाणीपुरवठा वाहिनीला गळती लागल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित वाहिनी बदलण्यात आली आहे तसेच कोदवली धरण व शीळ जॅकवेल परिसरात दोन मोठे तर अर्जुना व कोदवली नदीपात्रात १५ वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन आहे.
शहरातील पाणीवितरण वाहिन्यांमधील गळती रोखणे, सार्वजनिक व खासगी विहिरींची स्वच्छता, शीळ जॅकवेलकडील स्वतंत्र वीजवाहिनीचे रखडलेले काम पूर्ण करणे, जनरेटर खरेदी आणि टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. कोदवली धरणात जास्तीत जास्त पाणीसाठा व्हावा यासाठी नवीन पर्यायी धरणाची झडपे बसवण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
शहरात पाणीपुरवठा वाहिन्यांवर विद्युतपंप बसवून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यक निधी शासनाकडून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खलिफे यांनी सांगितले. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून टंचाई निवारणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT