कोकण

मालगुंडचे सुनील मयेकर यांना श्री. बा. कारखानीस पुरस्कार

CD

rat११p२.jpg-
६९१२९
सुनिल मयेकर

मालगुंडचे सुनील मयेकर यांना
श्री. बा. कारखानीस पुरस्कार
रत्नागिरी, ता. ११ ः कोकण मराठी साहित्य परिषदेचा (कोमसाप) २०२४-२०२५ चा साहित्य, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रातील रत्नागिरी-रायगड-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘श्री. बा. कारखानीस पुरस्कार’ मालगुंड शिक्षण संस्थेचे उपक्रमशील चेअरमन तसेच मालगुंड गावचे माजी सरपंच सुनील उर्फ बंधू मयेकर यांना जाहीर झाला आहे.
सुनील मयेकर हे १९८३ पासून मालगुंड शिक्षण संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत असून सध्या ते चेअरमनपदाची धुरा कुशलतेने सांभाळत आहेत. त्यांनी शिक्षण संस्थेच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत भौतिक सुविधांची निर्मिती, सुसज्ज इमारती व अद्ययावत वर्गरचना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, आपत्कालीन आर्थिक मदत निधी योजना, वृक्षसंवर्धन उपक्रम, विद्यार्थी-शिक्षक-पालक सुसंवाद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे रोबोटिक्स क्लासेस यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर व केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या २८ व २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणाऱ्या केंद्रीय साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT