कोकण

समानता आणि माता भगिनी

CD

नवदुर्गा - लोगो

इंट्रो

नवदुर्गांचा सन्मान हा घरापासून आणि घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वत्र होणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. सध्या नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव खाजगी आणि सार्वजनिक स्तरावर साजरा होतो आहे. यानिमित्ताने सर्वानीच नवदुर्गांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त सण, उत्सवापुरताच नव्हे तर कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रण केला पाहिजे...!

- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली

-------

समानता आणि माता भगिनी

समानता आणि माता भगिनी हे शब्दप्रयोग फक्त लेखन आणि भाषणापुरतेच मर्यादित आहेत का? अशी शंका उत्पन्न व्हावी इतकी गंभीर परिस्थिती सर्वत्र आहे. नवदुर्गांचा सन्मान हा प्रतिदिन प्रतीक्षणी घरापासून आणि घरातून बाहेर पडल्यानंतर प्रवासापासून करता ते तिच्या कामाच्या कार्यालयापर्यंत किंवा ठिकाणापर्यंत सर्वत्र होणे अतिशय महत्त्वाचे आहे. बाललैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ, हे दुर्दैवी आहे. पोक्सो कायदा आणि कौटुंबिक छळांतर्गत गुन्ह्यांची नोंद वाढत असून, ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. नुकत्याच समोर आलेल्या पोलीस प्रशासनाच्या अहवालानुसार, सोशल मीडियाचा वाढता गैरवापर, बालविवाह आणि माहेरहून पैशांची मागणी यामुळे या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात ८० लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांपैकी ५० पेक्षा जास्त गुन्हे हे थेट पोक्सो अंतर्गत नोंदवले गेले आहेत. कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात दरवर्षी कौटुंबिक छळाचे (भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत) अनेक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये आणि महिला तक्रार निवारण केंद्रांकडे नोंदवले जातात.
पोलीस प्रशासनाकडून यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हेल्पलाईन १०९१ महिला सुरक्षा आणि ११२ / १०० तात्काळ पोलीस मदत यासह दामिनी पथक, भरोसा सेल हे सर्व जरी असले तरी एकंदरीत परिस्थिती पाहता मानसिक बदलावर फार मोठे काम उभ राहणं अत्यावश्यक गोष्ट आहे.
सध्याच्या जेंनझीची बदललेली मानसिकता त्यानंतर येणाऱ्या अल्फा आणि आत्ताच्या बीटा या वयोगटातील जी पिढी निर्माण होणार आहे त्यांच्यावर अत्यंत सावधपणे संस्कार करणे गरजेचे आहे. ही संपूर्ण जबाबदारी ही पालकांची आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर हा चांगल्या पद्धतीने कसा करायचा याचं शिक्षण प्रत्येक घरातून आपल्याच वडीलधाऱ्या माणसांनी करणे ही काळाची गरज आहे. हे शक्य झालं तरच मुलांची मानसिकता बदलेल. युवकांची मानसिकता बदलेल आणि त्याचबरोबर सर्व समाजाची ही मानसिकता बदलणार आहे.

(लेखक निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून मानसिक बदल या विषयाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT