कोकण

भाजीपाल्याचे दर कडाडले, कांदा सत्तरीत

CD

कांदा सत्तरीपार, लसूण अडीचशेवर
भाजीपाल्याचे दर कडाडले; उपवासाच्या पदार्थांसह फळेही महागली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांसह फळे आणि भाजीपाल्याला मागणी वाढली आहे; मात्र, यंदा पावसाअभावी भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारात दराचा भडका उडाला आहे. बाजारातील भाज्यांचे दर शंभरीपार गेल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. कांद्याने सत्तरी पार केली असून, लसूण २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. मटार, गवार, फरस बी, घेवडा आणि शेवग्याच्या शेंगांचे दरही चढेच असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
नवरात्रोत्सवात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात. काही भाविक एकभुक्त राहतात तर काहीजण फलाहारावर भर देतात. त्यामुळे या काळात फळे, रताळी, भोपळा, दुधी भोपळा आणि इतर उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना विशेष मागणी असते. यंदा मात्र मागणी वाढण्याबरोबरच उत्पादनातील घट आणि पावसाची दडी यामुळे बाजारभाव वाढले आहेत. परिणामी, गरजेच्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
यंदा लिंबाचे उत्पादन कमी आहे. त्यातच पावसाअभावी उन्हाचा कडाका जाणवत असल्याने लिंबांना मागणी वाढली आहे. बाजारात दहा रुपयांना एक लिंबू तर २० रुपयांना तीन लिंबू या दराने विक्री सुरू आहे. उपवासाच्या पार्श्वभूमीवर विविध फळांची मागणी वाढली असतानाच त्यांच्या दरातही वाढ झाली आहे. बाजारात मुळा, माठ, मेथी, शेपू, चवळी आणि पालकसारख्या पालेभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावठी पालेभाज्यांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे. सध्या ३० रुपये एक जुडी तर ५० रुपयांना दोन जुड्या या दराने पालेभाज्यांची विक्री होत आहे. एकीकडे नवरात्रोत्सवामुळे बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली असली तरी दुसरीकडे भाजीपाला आणि फळांच्या वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांना खिशाला कात्री लागत आहे.
---
मटार दोनशेच्या घरात
भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, कांद्याचा दर ७० रुपयांच्या पुढे गेला आहे. लसूण २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. मटारचे दर १८० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. गवार, फरसबी आणि घेवडा प्रत्येकी १२० रुपये किलो दराने विकले जात आहेत. शेवग्याच्या शेंगांचे दरही १४० ते १६० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. दुसरीकडे, बटाट्याचे दर तुलनेने स्थिर असून, ३० ते ३५ रुपये किलो दराने त्यांची विक्री सुरू आहे.
-------
रताळ्यांना मागणी
नवरात्रोत्सवातील उपवासामुळे रताळ्यांना बाजारात चांगली मागणी आहे. विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर रताळी विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांचे दर ७० ते ८० रुपये किलो आहेत. उपवासासाठी गाजर, दुधीभोपळा आणि तांबड्या भोपळ्याचीही खरेदी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT