- rat१२p१२.jpg-
26O69407
साखरपा ः समस्यांचा आढावा घेताना आमदार किरण सामंत. सोबत माजी आमदार सुभाष बने, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी.
---
बैठकीला येताना पूर्ण माहिती आणा!
किरण सामंत यांची अधिकाऱ्यांना ताकीद; दाभोळे गटाची आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १२ ः दाभोळे जिल्हा परिषद गटातील जनतेच्या समस्या निवारणासाठी तसेच दुष्काळग्रस्त समस्येची माहिती घेण्यासाठी घेतलेल्या सभेत आमदार किरण सामंत यांनी पाणीपुरवठा व इतर विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बैठकीत पूर्ण माहिती न दिल्यामुळे आमदार संतापले आणि पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण इथे येऊ नये, अशी ताकीद अधिकाऱ्यांना त्यांनी दिली.
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या अडीअडचणी व समस्या निवारणासाठी तसेच दुष्काळग्रस्त समस्येबाबत माहिती घेण्यासाठी काल (ता. १०) ही सभा झाली. या वेळी पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे पाणी नियोजनाबाबत पूर्ण माहिती मिळू शकली नाही; मात्र गावपातळीवर ग्रामसेवकांनी चांगले काम केल्याचे निदर्शनास आले. गावात पाणी अडवण्यासाठी जास्तीत जास्त बंधारे बांधा, असेही सांगून यापुढे कोणत्याही कार्यालयातील अधिकाऱ्याला तुम्ही बोलावून सहकार्य मागू शकता, असे आमदार सामंत यांनी ग्रामसेवकांना सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाणी अडवा पाणी जिरवा, असे बंधारे बांधावेत असेही या वेळी सांगण्यात आले. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही काही तक्रारीबाबत सूचना देण्यात आल्या. शेतीचे पंचनामे त्वरित करून ई-पीकपाणी नोंद त्वरित करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. पाणी अडवा पाणी जिरवा, या संकल्पनेला रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे ठेकेदार अडचण ठरत आहे. रोज हजारो लिटर पाणी वापरत असून, त्याबाबत त्यांना समज देऊन त्यांनीच मोठा बंधारा घालून पाणी अडवून वापरावे, अशी सूचना संजय गांधी यांनी केली तसेच शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा काढण्यास गेल्यास साईट बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही साईट त्वरित सुरू करावी, अशी मागणी मेघीचे उपसरपंच गंगाराम केसरकर यांनी केली. येत्या चार-पाच दिवसात ही साईट व्यवस्थित होईल, असे आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.
या सभेला माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके प्रांत अधिकारी जीवन देसाई तहसीलदार अमृता साबळे, संगमेश्वर पोलिस निरीक्षक किणी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हा नियोजन सदस्य बापूशेट्ये यांनी सूत्रसंचालन केले.
----
त्वरित नवीन मीटर द्या
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करू नये किंवा थकीत बिल असलेल्या ग्रामपंचायतींना नवीन मीटर जोडणीसाठी अडवू नये त्यांना त्वरित नवीन मीटर द्यावा, असे आमदार सामंत यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा कृषिपंपांचा वीजपुरवठा बिल थकीत असले तरी तोडू नये, अशा सूचना आमदार सामंत यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.