- rat१२p५.jpg -
26O69376
चिपळूण ः विभागस्तरावर निवड झालेले खेळाडू.
सावर्डेच्या खेळाडूंनी गाजवले मैदान
जिल्हास्तरीय स्पर्धेत यश; २२ जणांची निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. २२ खेळाडूंची कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात सागर शर्मा याने ३००० मीटर, १५०० मीटर आणि सहा किलोमीटर क्रॉसकंट्री धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अजिंक्य भाईजे याने थाळीफेकमध्ये द्वितीय, पृथ्वी राजभर याने ८०० व १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय तर सहा किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेतही त्याने विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. मुलींच्या गटात प्रांजल हुमणे हिने लांब उडी व तिहेरी उडीमध्ये द्वितीय क्रमांक तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. वेदिका बामणे हिने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक तर सृष्टी खेराडे हिने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत सागर शर्मा, पृथ्वी राजभर, विघ्नेश घाणेकर, श्रवण आग्रे व रोहन घाणेकर यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कस्तुरी घाग हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघात कस्तुरी घाग, सृष्टी कानसे, आदिती पाष्टे, अर्णवी चव्हाण व स्वरा राणिम यांचा समावेश होता. १४ वर्षांखालील मुलांच्या ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत अथर्व कानसे, रूद्र खापरे, सर्वेश खापरे, आर्यन घाणेकर व अथर्व बेचावडे यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या पात्र खेळाडूंची कोल्हापूर विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.