69517
चिपळूण पालिकेच्या कामकाजाचे स्थलांतर
दोन ठिकाणी काम सुरू : नागरिकांना सहकार्याचे आवाहन
चिपळूण, ता. १२ : नगरपालिकेच्या ब्रिटिशकालीन मुख्य प्रशासकीय इमारतीला लवकरच निरोप दिला जाणार आहे. या जागेत अत्याधुनिक व सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले टाकली आहेत. नव्या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा मंजूर झाली असून, बांधकामाची कार्यवाही सुरू केली. त्यासाठी जुन्या इमारतीतील प्रशासकीय व राजकीय कामकाज तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. १२) पालिकेचे कामकाज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एल टाईप) शॉपिंग सेंटर या दोन ठिकाणी सुरू झाले आहे.
चिपळूण पालिकेची सध्याची मुख्य प्रशासकीय इमारत जुनी झाल्याने त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नव्या इमारतीच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू होत असून, त्यासाठी जुन्या इमारतीतील विविध विभाग आणि कार्यालये पर्यायी ठिकाणी हलविली आहेत. या स्थलांतरामुळे नागरिकांना विविध विभागांतील कामांसाठी निश्चित केलेल्या दोन ठिकाणी संपर्क साधावा लागणार आहे.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कार्यालय अधीक्षक यांच्यासह आस्थापना विभाग, सभा विभाग, लेखा विभाग, बांधकाम विभाग, रचना विभाग आणि संगणक विभाग कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रमुख प्रशासकीय कामकाजाचा कारभार या ठिकाणाहून चालवला जाणार आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर येथे उद्यान विभाग, अग्निशमन विभाग, पाणीपुरवठा विभाग, अभिलेख व भांडार विभाग, नागरी सुविधा केंद्र, वसुली विभाग, एनयूएलएम विभाग, विवाह नोंदणी विभाग, वाहनविभाग, मालमत्ता विभाग तसेच विधी व न्याय विभाग कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा, वसुली, नागरी सुविधा आणि मालमत्तेसंबंधी कामांसाठी नागरिकांना या ठिकाणी जावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.