-rat१२p३५.jpg-
26O69483
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये शारदोत्सवात देवीची आरती करताना ॲड. सुमिता भावे व शिक्षिका.
-----------
फाटक हायस्कूलमध्ये
नवरात्रो वाचा जागर
रत्नागिरी : फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शारदोत्सवाचा प्रारंभ झाला. जागर आरोग्याचा या संकल्पनेवर यंदाचा शारदोत्सव साजरा होत आहे. दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा ॲड. सुमिता भावे यांनी शारदादेवीचे पूजन केले. या प्रसंगी संस्थेचे राजीव गोगटे, शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेत गेल्या वर्षापासून शारदोत्सव साजरा करण्यात येत आहे. नऊ दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील प्रात्यक्षिकांसह आरोग्यविषयक तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने होणार आहेत.
‘देव, घैसास, कीर’मध्ये वाचन प्रेरणा दिन
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तकाचे वाचन केले व त्या पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपप्राचार्या वसुंधरा जाधव यांनी सर्व मुलांना वाचनावर आधारित व्याख्यान देऊन मार्गदर्शन केले. आशा आजगावकर या ज्ञानकक्षाला क्षेत्रभेट देण्यात आली. येथे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पुस्तके हाताळली. या प्रसंगी आयक्युएसी समन्वयक विनय बावदाने, मराठी विभागप्रमुख गौरी हळदवणेकर, ग्रंथालय विभागप्रमुख प्रियांका देवरूखकर व विद्यार्थी उपस्थित होते.
-rat१२p३३.jpg-
26O69481
रत्नागिरी : रमा कानविंदे हिचे अभिनंदन करताना मुख्याध्यापिका जानकी घाटविटलकर. डावीकडून धनेश रायकर, रूपेश पंगेरकर व श्रीराम भावे.
रमा कानविंदेचे ‘शब्दवेध’मध्ये यश
रत्नागिरी ः श्रीमंत मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय ‘शब्दवेध’ अभिवाचन स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलच्या अभिवाचन रमा कानविंदे हिने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. प्रकारामध्ये (गट १) तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला गौरवण्यात आले. तिला ‘सेवासंकल्प अभियान’अंतर्गत तिच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल आणि कल्पकता, विचारशक्ती व अभिव्यक्तीच्या उत्तम प्रदर्शनाबद्दल विशेष प्रशस्तिपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
-rat१२p३२.jpg-
26O69480
रत्नागिरी ः आगाशे विद्यामंदिरात मातकाम उपक्रमात मातीपासून वस्तू बनवण्यात गुंग असणारे विद्यार्थी.
---
आगाशे विद्यामंदिरात मातकाम उपक्रम
रत्नागिरी ः कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मातकाम उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. वर्गशिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली चिमुकल्या हातांनी मातीच्या स्पर्शातून स्वतःचे एक वेगळेच कलाविश्व निर्माण केले. डिजिटल स्क्रीन आणि पुस्तकी जगात रमणाऱ्या या हातांनी जेव्हा ओल्या मातीचा स्पर्श अनुभवला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या दरम्यान विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक वस्तू, प्राणी, पक्षी, फळे, भाज्या आणि देवदेवतांच्या मूर्ती साकारल्या. मुलांनी मातीला दिलेले आकार त्यांच्यातील सुप्त कलागुणांची साक्ष देत होते. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यशस्वीरीत्या साजरा झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.