कोकण

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाचा होणार पूर्ण कायापालट

CD

प्रादेशिक मनोरुग्णालयाचा होणार कायापालट
१३.४५ कोटींचा निधी; मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : अनेक वर्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या येथील ‘प्रादेशिक मनोरुग्णालया’च्या इमारतींना अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. उत्तर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने संपूर्ण रुग्णालय परिसराचे नूतनीकरण आणि बळकटीकरणाचे व्यापक काम हाती घेण्यात आले आहे. तब्बल १३ कोटी ४५ लाख रुपये अंदाजित खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
गेल्या काही काळापासून प्रादेशिक मनोरुग्णालयातील जुन्या इमारतींची दैना झाली होती. छताची पडझड, गळती आणि सुविधांचा अभाव यामुळे येथे दाखल असलेल्या रुग्णांसह वैद्यकीय प्रशासन व कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या कामाचा कार्यारंभ आदेश २४ सप्टेंबर २०२४ ला देण्यात आला होता. पुढील २४ महिन्यांच्या मुदतीत म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सध्या नूतनीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत रुग्णालयातील १३ वॉर्डाचे मुख्य बांधकाम, रूफिंग (छत दुरूस्ती), अंतर्गत व बाह्य प्लास्टर तसेच प्लम्बिंगची कामे पूर्ण झाली आहेत.
----
रुग्णांना दर्जात्मक सोयीसुविधा
या सर्वसमावेशक आधुनिकीकरणामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या मनोरुग्णांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, हवेशीर आणि अत्याधुनिक वातावरण उपलब्ध होणार आहे. इमारतींच्या बळकटीकरणामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न तर सुटेलच शिवाय प्रशासनालाही आरोग्यसेवा पुरवणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Airport: वैमानिकाला धावपट्टी दिसेना, लँडिंग करता येईना!, नगरच्या भाविकांसोबत जम्मू विमानतळावर थरार

तरुण व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू, मॉडेलसोबत लिव्ह इनमध्ये रहायचा; फ्लॅटवर सापडली शक्तिवर्धक औषधं अन् आक्षेपार्ह वस्तू

Accident News: वैजापूरजवळ भीषण अपघात; केंद्रीय सुरक्षा दलातील जवानासह मामेभावाचा मृत्यू

Mumbai Weather: मुंबईनं मोडला 11 वर्षांचा रेकॉर्ड! तापमान थेट ३८.२ अंश पार; पुढील ६ तास उष्णतेच्या लाटेचा इशारा

सेरेब्रल पाल्सीमुळे हालचालींवर कसा होतो परिणाम? Breaking Bad फेम RJ Mitte यांच्या आजाराविषयी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT