-rat१३p२५.jpg-
26O69767
रत्नागिरी ः माळनाका येथील स्कॉयवॉकला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्या ठिकाणी आता आर्टगॅलरी उभारली जात आहे.
----
स्कायवॉकचे ‘आर्ट गॅलरीत’ रूपांतर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वात आणखी एक भर पडणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची पायाभरणी होत आहे. माळनाका येथील स्कायवॉकचे ‘आर्ट गॅलरी’मध्ये रूपांतर केले जात आहे.
राज्यात अशा प्रकारची स्कायवॉक आर्ट गॅलरी प्रथमच उभारण्यात येत आहे. कलाप्रेमींसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. साधारण १५० फूट लांबीची ही अत्यंत भव्य आणि सुसज्ज आर्ट गॅलरी असणार आहे. या गॅलरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यात महाराष्ट्रातील नामांकित चित्रकार, शिल्पकार तसेच विविध कलामाध्यमांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृती कायमस्वरूपी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना एकाच छताखाली उच्चदर्जाच्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. केवळ प्रथितयश कलाकारच नव्हे तर नवनवीन कल्पना घेऊन येणाऱ्या उदयोमुख तरुण कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या गॅलरीमध्ये एक विशेष स्वतंत्र दालन राखीव ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून तरुण कलाकारांना आपली कला राज्यासमोर व देशपातळीवर सादर करण्यासाठी एक हक्काचे आणि भव्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, लवकरच ही कलाप्रेमींसाठी खुली करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.